शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

द्रुतगतीवरील ‘खंडाळा एक्झिट’ बनलाय ब्लॅक स्पॉट

By admin | Published: May 27, 2016 4:57 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा एक्झिटचा उतार व तीव्र वळण धोकादायक बनले आहे. सतत होत असलेल्या अपघातांमुळे हे ठिकाण मार्गावरील ब्लॅक स्पॉट बनले आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा एक्झिटचा उतार व तीव्र वळण धोकादायक बनले आहे. सतत होत असलेल्या अपघातांमुळे हे ठिकाण मार्गावरील ब्लॅक स्पॉट बनले आहे. महामार्गावरील या ब्लॅक स्पॉटवर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला बुधवारी रात्री अपघात झाला. त्या वेळी दुभाजकाभोवती आवश्यक कठडे व सुरक्षात्मक उपायोजना नव्हत्या. याबद्दल नागरिकांनी व प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.भारतातील पहिला जलदगती मार्ग म्हणून नावलौकिक असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास वेगवान झाला. मात्र, या महामार्गावरील खंडाळा एक्झिट येथील उतारावर सतत अवजड वाहने उलटणे, समोरच्या वाहनांना धडकणे, दुभाजक तोडत विरुद्ध लेनवर जाणे असे अपघात होतात.आनंद अभ्यंकर यांच्या अपघातानंतर या मार्गावर दोन्ही कॉरिडोरच्या मध्ये सुरक्षेकरिता बायफ्रेन रोप लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे रोप सर्वत्र लावलेले नाहीत. दगडी चिरे असणाऱ्या भागात, विशेषत: खंडाळा घाट व परिसरात हे रोप लावण्यात आलेले नाहीत. उतार व वळणामुळे वारंवार अपघात घडतात. त्या खंडाळा एक्झिटजवळील दुभाजकाची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नगरसेवक प्रमोद गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, स्वाभिमान संघटनेचे लोणावळा शहराध्यक्ष शौकत शेख यांनी केली होती. (प्रतिनिधी)रस्ते विकास महामंडळ व आयआरबीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुभाजकाची उंची या भागात वाढविली नाही. बायफ्रेन रोप न लावल्याने येथे वळणावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने अवजड वाहने एक तर थेट समोरच्या वाहनांना धडकतात; अन्यथा दुभाजकावरून विरुद्ध लेनवर जाऊन अपघात होतात. या ठिकाणी महिन्यात सरासरी किमान दोन तरी अपघात घडतात. या धोकादायक ठिकाणी प्रशासकीय पातळीवर काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.बुधवारी रात्री साडेअकरा वाजता अशाच एका अपघातात डी. एस. कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले. तर, काहीही चूक नसताना त्यांचा चालक ठार झाला. तीन वर्षांपूर्वी ओझर्डे गावाजवळ रस्ता दुभाजक ओलांडून आलेल्या एका गाडीच्या धडकेने प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर व अन्य एकाचा मृत्यू झाला होता.