शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांचा काळ्या फिती लावून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:38 IST

पुणे महापालिकेच्या खोट्या आश्वासनाने वेचक संतप्त

ठळक मुद्देकोव्हिडं सुरक्षा साहित्य, आयुर्विमा पुरवण्याची मागणी

पुणे: कोरोनाच्या काळात स्वच्छ संस्थेच्या अंतर्गत असंख्य कचरा वेचक कार्यरत आहेत. ते स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करत आहेत. त्यांच्या कोव्हिडं सुरक्षा साहित्य पुरवणे, आयुर्विमा काढणे, ढकलगाडी देणे, या मागण्या पूर्णत्वाकडे जात नाहीत. पुणे महापालिका फक्त याबाबत आश्वासन करत आहे. स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांनी या गोष्टीचा काळ्या फिती लावून निषेध दर्शवला आहे.

आम्ही आमचे काम शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत. पण पालिकेने मागण्यांचा विचार केला नाही. तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या सुरक्षेबाबत साहित्य पुरवण्याचे महापालिका ठरवत आहे. पण त्या गोष्टी कागदावरच राहिल्या आहेत. तसेच आयुर्विमा काढून देण्याचे नुसते जाहीर केले. प्रत्यक्षात अजूनही विमा काढून दिला नाही. असा आरोपही त्यांनी केला आहे. शहरातील ३० लाखाहून नागरिक आणि ११५ नगरसेवकांचा लेखी पाठिंबा आमच्या कामाचे यश अधोरेखित करत नसेल. तर महापालिकेला कचरा व्यवस्थापनातून काय अपेक्षा आहेत हे आम्हाला समजत नाही. असे कचरा वेचक प्रतिनिधी नाईकनवरे यांनी सांगितले आहे. 

कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडे सध्या ढकलगाडीही दिलेली नाही. महापालिकेने मान्य केलेला आयुर्विमा  पीपीई किट, काम करण्याचे साहित्य यापैकी आमच्यापर्यंत काहीही पोहोचत नाही. आमच्या उपजीविकेच्या कंत्राटीकरणाबद्दलच्या चर्चांना वेग पाहून चीड येत आहे. तरीही आम्ही ना थांबता काम सुरू ठेवले आहे. याची जाणीव महापालिकेला आहे का. असा प्रश्न कचरा वेचक राणी शिवचरण यांनी उपस्थित केला आहे. 

नागरिकांसोबत असलेली सामाजिक बांधिलकी जपत कचरा वेचक शहराच्या आरोग्यासाठी इथून पुढेही आपले काम थांबवणार नाहीत. जनतेच्या सेवेसाठी नेहमीच हजर राहतील. पण महापालिकेने आमच्या मागण्यांचा विचार करावा. अशी विनंती स्वच्छचे सदस्य आलोक गोगटे यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या