शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भाजपचे नवीन शहर कार्यालय ‘राष्ट्रवादी’च्या शेजारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: भारतीय जनता पार्टीच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी भवन सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी भवन सुरू केल्यानंतर भाजपने लगेचच हा निर्णय घेतला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपचे नवे कार्यालय राष्ट्रवादी भवनपासून जवळच आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र ‘आम्ही राष्ट्रवादीपासून फार लांब आहोत व लांबच राहणार’ असे उत्तर दिले.

शनिवारवाडा ते महापालिका दरम्यानच्या रस्त्यावर एका इमारतीत हे नवे कार्यालय सुरू करण्यात आले. नेते, पदाधिकारी वगळता भाजप कार्यकर्त्यांना याची पुरेशी कल्पना नव्हती असे दिसते; कारण अचानकच हा निर्णय झाला, अशी माहिती देण्यात आली.

जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मानचा पहिला मजला भाजप कार्यालय म्हणून वापरत होते. खासदार गिरीश बापट यांनी या जागेत कार्यालय आणले. त्याआधी ते जोगेश्वरीच्या बोळामध्ये अप्पा बळवंत चौकात होते. सन्मानमध्ये कार्यालय सुरू झाल्यापासून भाजपाच्या राजकीय यशाची पुण्यातील कमान नेहमी चढती राहिली अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. महापालिकेत प्रथमच स्वबळावर सत्ताही भाजपला याच कार्यालयात असताना मिळाली. आता ते बदलण्याचे कारण कळत नाही, असे काही कार्यकर्ते म्हणाले.

हॉटेल सन्मानच्या संचालक मंडळाकडूनही याची विशेष माहिती मिळाली नाही. हे कार्यालय भाडेतत्त्वावरच होते व नवे कार्यालयही भाडेतत्त्वावरच आहे.

भाजपमधून खासदार बापट यांचे पुण्यातील वर्चस्व कमी केले जात असल्याचे सध्या बोलले जात असते. कोल्हापूरहून पुण्यात येऊन कोथरूडमधून आमदार झालेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यात स्वतंत्र गट तयार होतो आहे. कार्यालयाच्या स्थलांतरामागे अशा काही गोष्टी असाव्यात अशी चर्चा आहे.

मुळीक यांनी मात्र याला नकार दिला. ती जागा कमी पडत होती. भाजपचा शहरातील विस्तार लक्षात घेता, बैठका, गटमेळावे, गटचर्चा यांसाठी मोठ्या जागेची गरज होती. त्यामुळे कार्यालय बदलाचा निर्णय घेण्यात आला. नव्या जागेत कार्यालय सुरू झाले असले तरी तिथे काही आवश्यक कामे करून घेतली जात आहेत. ती झाली की जाहीरपणे कार्यक्रम करून कार्यालय सुरू केले जाईल, असे मुळीक यांनी सांगितले.