शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप लागला कामाला; सगळ्यांचीच घेतली कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 23:03 IST

पुणे महापालिकेची निवडणूक वर्षभरावर आली असल्यानं कार्यशाळेचं आयोजन

पुणे महापालिकेतल्या नगरसेवकांनी आज दिवसभरात भाजपच्या इतिहासापासून ते मोदी सत्तेत आल्यापासून पक्षात धोरणांमध्ये झालेल्या बदलापर्यंतचे धडे गिरवले. काही नगरसेवक निवडणुकीच्या आधी पक्ष सोडण्याच्या तयारीत असतानाच घेण्यात आलेल्या ‘कार्यशाळे’च्या माध्यमातून नाराजांची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीला आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. गेल्यावेळी भाजपने निवडणुकीत जवळपास सेंच्युरी मारत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या वर्षी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी भाजप नगरसेवकांनी केली असली तरी कोरोनामुळे या सगळ्या प्रकल्पांसाठी यंदा तरतूद आणि पाठपुरावा करण्याची वेळ भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते यंदा लवकरच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रदेशाध्यक्षच पुण्यात असल्याने यंदा गेल्या निवडणुकांच्या तोडीस तोड कामगिरी करण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. यापूर्वी पुण्यात काही कार्यक्रम घेतले गेले असले तरी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. त्यातच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षातले अनेक नगरसेवकही विविध कारणांनी नाराज असल्याच्या पार्श्वभुमीवर नगरसेवकांना एकत्र आणत नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. महापालिकेतील सत्ता राखण्याचं आव्हान; पुण्यात भाजप नगरसेवकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

उद्घाटनाच्या निमित्तानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाची उजळणी केली. हे करतानाच पक्षाची सध्याची ‘कार्यपद्धती’ नगरसेवकांना पुन्हा सांगण्यात आली. त्यापाठोपाठ सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प समजावतानाच मोदींनी त्यात केलेल्या बदलाचे महत्वही नगरसेवकांना समजावले. यापाठोपाठ श्रीकांत भारतीय सोशल मिडियाच्या वापराबाबत ट्रेनिंग दिले. 

तब्येतीच्या कारणाने गैरहजर राहिलेले दोन नगरसेवक वगळता बाकी सगळे या कार्यशाळेला पूर्ण वेळ उपस्थित असतील याची दक्षता भाजपनी घेतली आहे. आज प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नगरसेवकांबरोबरच मुक्कामही केला आहे. शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल पाच तास हजेरी लावत मार्गदर्शन करणार आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये नगरसेवकांना कामावर लक्ष द्यायला आणि जनसंपर्क वाढवण्याची सूचना प्रत्येक नेत्याकडून करण्यात येत असल्याची माहिती एका नगरसेवकाने लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा