शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

भाजपाने टाळली यादी

By admin | Updated: February 3, 2017 04:24 IST

महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याच्या भीतीने भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा १४४ उमेदवारांना

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याच्या भीतीने भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा १४४ उमेदवारांना फोन करून कार्यालयातून बोलावून गुपचूप ए व बी फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यानुसार पक्षाने ५ विद्यमान नगरसेवकांसह ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे तिकीट पक्षाकडून कापण्यात आले. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनपेक्षित नावांवर मोहोर उमटविण्यात आल्याचे दिसून येत आहे.भाजपाच्या उमेदवारांची नावे निश्चित करताना पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजीचे दर्शन झाले. अनेक उमेदवारांच्या नावावर शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करून उमेदवारांची नावे निश्चित केली. मध्यरात्री उशिरापर्यंत १५ नावांवर एकमत होऊ शकले नाही. अखेर उमेदवारांची यादी जाहीर न करता गुपचूप ए व बी फॉर्मचे वाटप करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला.कसबा मतदारसंघातील विद्यमान चौघा नगरसेवकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला आमदारांच्या विरोधामुळे तिकीट देण्यात आले नसल्याची माहिती उजेडात आली आहे. भाजपाच्या या उमेदवार यादीमुळे मोठी नाराजी पसरली आहे. उमेदवारी देण्यात आलेल्या उमेदवारांना गुरुवारी रात्री भाजपा कार्यालयातून फोन करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, मुक्ता टिळक, अनिल टिंगरे, हेमंत रासने, मंजूश्री नागपुरे, प्रकाश ढोरे, श्रीनाथ भिमाले, श्रीकांत जगताप, सुनील कांबळे, प्रसन्न जगताप, वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, अभिषेक देवकर, सिद्धार्थ शिरोळे, मदिना तांबोळी, योगेश समेळ, धीरज घाटे, महेश लडकत, स्मिता वस्ते, राजा बराटे, गायत्री खडके, सुश्मिता चौधरी, वृषाली चौधरी, सम्राट थोरात, आरती कोंढरे, पप्पू कोठारी, अजय खेडेकर, रोहिणी नाईक, उमेश चव्हाण, अमोल बालवडकर, राहुल कोकटे, आदित्य माळवे, सतीश बहिरट, राजश्री काळे, योगेश मुळीक, दिलीप तुपे, संदीप जऱ्हाड, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, आशा बिबवे, कल्पना जाधव आदींचा समावेश आहे. एक हजारपेक्षा जास्त इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या.(प्रतिनिधी)शिवसेनेनेही यादी जाहीर करणे टाळलेभाजपाबरोबरच शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळले आहे. शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही इच्छुकांनी पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उर्वरित इच्छुकांकडून शुक्रवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पक्षाकडून ए व बी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे.इच्छुकांनी जागविली रात्रभाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता शुक्रवारी रात्री गुपचूप फोन करून ए व बी फॉर्म घेण्यासाठी बोलावले जात होते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी फोन हातात घेऊन रात्र जागून काढली. नाराजीचा सामना करावा लागणार भाजपाकडून विद्यमान नगरसेवकांसह अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.नव्याने आलेल्यांचे पत्ते कटइतर पक्षांमधील अनेक आजी व माजी नगरसेवकांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला. मात्र त्यापैकी अनेकांना भाजपाकडून तिकीट देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.