शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व वयोगटातील पुणेकरांना लस विनामूल्य उपलब्ध करून द्या, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:23 IST

कोरोनाची स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार ठरले अपयशी जगदीश मुळीक यांचा आरोप

ठळक मुद्देपुणे शहरात गेल्या आठवड्यापासून होते झपाटयाने रूग्ण वाढ

राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. सरकार जबाबदारी घेण्यापेक्षा सर्व काही सर्वसामान्य जनतेवर ढकलत आहे. पुण्यातही कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे सर्व वयोगटातील पुणेकरांना कोरोना प्रतिबंध लस तातडीने विनामूल्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी ७१.६९ टक्के रूग्ण महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत आहेत. त्यातही पुणे शहरात गेल्या आठवड्यात रूग्ण वाढीचा वेग वाढला आहे. गेल्या २४ तासांत १८०५ नागरिक नव्याने कोरोनाबाधित झाले. कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण २१ टक्के इतके मोठे आहे. त्यामुळे ही गंभीर स्थिती हाताळण्यासाठी सर्व वयोगटातील पुणेकर नागरिकांना तातडीने विनामूल्य कोविड प्रतिबंध लस द्यावी, असे मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाचा वेगाने  फ़ैलाव होत असताना त्याचा मुकाबला करण्यात राज्य शासनाचे प्रयत्न अतिशय तुटपुंजे आहेत. उपाययोजना करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेले नाही. सर्वसामान्य नागरिकांना, व्यापार्‍यांना, बारा बलुतेदारांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा लॉकडाउन करण्याकडे भर दिसतो. परंतु सामान्य नागरिक आणि व्यापार्‍यांचा लॉकडाउनला तीव्र विरोध आहे. लॉकडाउन झाल्यास सर्वांचीच आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची होणार आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रांत आघाडीवर असणार्‍या पुणे शहराला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्व वयोगटातील पुणेकर नागरिकांना तातडीने विनामूल्य कोविड लस उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुळीक यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Puneपुणेjagdish mulikजगदीश मुळीकCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार