पुणे : ब्रेक निकामी झाल्याने पीएमटी बस टेम्पोवर आदळल्याने सात वाहनांचा अपघात होऊन मोटारसायकलस्वर जागीच मृत्युमुखी पडला, तर एकजण गंभीर झाला. सोमवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास अप्पर इंदिरानगरमध्ये भर चौकात हा विचित्र अपघात झाला.काळूराम नुकुंब (५०) असे मृताचे नाव आहे. योगेश कुडले गंभीर जखमी असून त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अप्पर डेपोमधून शिवाजीनगरकडे निघालेल्या पीएमटी बसचा ब्रेक दुपारी पावणेबाराच्या दरम्यान निकामी झाला. त्यामुळे बस कोल्ड ड्रिंक्सने भरलेल्या टेम्पोवर आदळली. हा टेम्पो दुसºया टेम्पोला जाऊन धडकला. तो टेम्पो सुखसागरनगरला निघालेल्या दुसºया पीएमटी बसला धडकला. या दरम्यान दोन मोटारसायकली बसच्या खाली गेल्या. त्यातीलच एक मोटरसायकल चालक काळूराम निकुंब यांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने जखमींना जवळच्या दवाखान्यात दाखल केले.
सात वाहनांचा विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:25 IST