शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलकांवर वाढदिवसाच्या जाहिराती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:14 IST

न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष : कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या फ्लेक्सबाजीला चांगले उधाण आले असून, वाढदिवस असो की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यामुळेच शहरात नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवरच थेट वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावतानादेखील भान राहिलेले नाही. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या व अनधिकृत फ्लेक्स लावणाºयांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स सर्वत्र झळकत आहेत. भावी आमदार म्हणून जागो-जागी मोहोळ यांच्ये फ्लेक्स लावण्यात आले आहेत. परंतु हे फ्लेक्स लावताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची दिशा दर्शविण्यासाठी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवरही सर्रासपणे अनधिकृतपणे जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी मदत करणाºया दिशादर्शक फलकांवरील या आतिक्रमणामुळे दिशाहीन होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या समोरच्याच दिशादर्शक फलकारवरही हा फ्लेक्स टांगलेला आहे. दिवाळीमुळे महापालिकेला सुट्टी असल्यावर शहरात फ्लेक्सला मोकळीक आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करावीमहापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनीच शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकाºयांना अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक लावणाºयांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरामध्ये दिवाळीनिमित्त लावण्यात आलेल्या व दिशादर्शक फलकांवर लावलेल्या फ्लेक्सवर संबंधित क्षेत्रीय अधिकारी कारवाई करतील.अनधिकृत फ्लेक्स असतील तर गुन्हे दाखल करूशहरामध्ये कोठेही फ्लेक्स, बॅनर लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या सन २००३ च्या नियमावलीनुसार दिशादर्शक फलकावर कोणत्याही परिस्थिती फ्लेक्स लावता येत नाहीत. अशा प्रकारे फ्लेक्स लागले असतील तरी संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील.- किशोरी शिंदे, घोले रोड क्षेत्रीय अधिकारी

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका