शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण कमी होताच घटला जैववैद्यकीय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसा वाढत गेलेला जैववैद्यकीय कचरा रुग्ण कमी होताच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसा वाढत गेलेला जैववैद्यकीय कचरा रुग्ण कमी होताच घटला आहे. सप्टेंबर सात टनांवर असलेला कचरा डिसेंबरमध्ये अडीच टनांवर आला आहे. कोरोना रुग्णांची कमी झाल्यानंतर अन्य रुग्णांची संख्या वाढून लागली आहे. त्यामुळे कोरोना व्यतिरीक्त अन्य रुग्णांचा जैववैद्यकीय कचराही वाढू लागला आहे.

विविध आजारांच्या रुग्णांवरील उपचारांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यासह पीपीई किट्स, जेवणाची ताटे व अन्य साहित्य असा सात ते आठ टन कचरा दिवसाकाठी निर्माण होत होता. महापालिकेने खासगी कंपनीसोबत जैविक कचऱ्याच्या प्रक्रियेबाबत करार केला आहे. डॉ. नायडू रुग्णालयाजवळील कैलास स्मशानभूमीजवळ असलेल्या या कंपनीमधील इन्सिनरेटमध्ये हा कचरा जाळला जात आहे. अतिरीक्त आलेला कचरा तळोजा, बारामती आणि सातारा येथे पाठविला जात आहे.

पुण्यातील प्रकल्पाची क्षमता चार हजार किलो कच-यावर विल्हेवाटीची आहे. आता कोरोनावरील कचरा कमी झाल्याने याच ठिकाणी विल्हेवाट लावली जात आहे.

====

कशी केली जाते वाहतूक?

हा कचरा बंदिस्त वाहनांमधून वाहून नेला जातो. त्याची पूर्णत: सुरक्षितपणे आणि वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावली जाते. हा बंदिस्त बॅगांमध्ये भरला जातो. या बँगांचे चार ते पाच वेळा निर्जंतुकीकरण केले जाते.

====

शहरातील कोरोना रुग्णांचा कचरा कमी झाला आहे. यासोबतच अन्य रुग्णांचा कचरा मात्र वाढला आहे. याचा अर्थ कोरोना व्यतिरीक्त अन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचार सुरु झालेले आहेत. डबल बॅगमध्ये हा कचरा भरला जातो. त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. पीपीई किट घालूनच हा कचरा हाताळला जात असून इन्सिनरेटरमध्ये जाळला जातो.

- डॉ. मनिषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

====

कोरोना काळातील जैववैद्यकीय कच-याची स्थिती

महिना कोरोनाचा कचरा अन्य जैविक कचरा एकूण वैद्यकीय कचरा

जुलै ४,९५४ ४,५०५ ९,४५९

ऑगस्ट ५०७१ ३१३९ ८,२१०

सप्टेंबर ६,९६० ६,५६० १३,५२०

ऑक्टोबर ५,२६२ ५,६२९ १०,८९१

नोव्हेंबर २,१९७ ५,२८५ ७,४८२

डिसेंबर २,५१८ ६,०१८ ८,५३६