शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुणे महापालिकेला सामाजिक दायित्वाचा आधार ; जमा झाले कोट्यवधींचे वैद्यकीय साहित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 20:30 IST

पुणे महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर वाचला खर्च 

ठळक मुद्देविविध संस्था, कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश

पुणे : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता पालिका प्रशासन दिवसरात्र काम करीत आहे. पालिकेकडे जसे वैद्यकीय मनुष्यबळ कमी होते, तसेच वैद्यकीय साहित्याचीही कमतरता होती. परंतू, विविध सामाजिक संस्था, संघटना, कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यक्तींनी पुढे येत कोट्यवधींचे वैद्यकीय साहित्य पालिकेला पुरविले. सामाजिक दायित्वामधून (सीएसआर) आलेल्या या साहित्यामुळे पालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाचला आहे.

कोरोनाची साथ आल्यानंतर रुग्णांची संख्याही वाढत गेली.सुरुवातीच्या काळात या आजाराच्या उपचारांसाठी लागणा-या वैद्यकीय साहित्याच्या खरेदीबाबत वेगवेगळे दर दिले जात होते. या काळात साहित्याची निकड असल्याने पालिकेकडून जादा दराने काही साहित्य खरेदीही केले गेले. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. नगरसेवकांकडून आम्हाला  ‘हिशोब’ द्या अशी मागणी सातत्याने केली जात होती. एकीकडे खरेदीवरुन वादंग माजलेला असतानाच पालिकेला मात्र, सीएसआरच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. पालिकेला पीपीई कीटपासून ते अगदी साध्या मास्कपर्यंत आलेले हे साहित्य विविध रुग्णालयांमध्ये, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांसह, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी यांना पुरविण्यात आले.  एवढेच नव्हे तर, अनेकांनी व्हेंटीलेटर, आयसीयू बेड, गोळ्या, थर्मामीटर, आॅक्सिमीटर, एन-९५ मास्कही भरभरुन दिले. हे सर्व साहित्य आरोग्य विभागाच्या स्टोअर विभागामध्ये जमा करण्यात आल्यानंतर तेथून आवश्यकतेनुसार वाटण्यात आले आहे. त्याच्या नोंदीदेखील ठेवण्यात आलेल्या आहेत.====ईसीजी जेली, कव्हेरॉल बॉयलर सूट, गॉगल्स, शुज लेगिंंज, डिस्पोजेबल बॅग्ज, फ्रोजन थंड पाकिटे, होमिओपॅथी गोळ्या (बॉटल्स), नेब्यूलायझर, ईसीजी मशीन, आयसीयूबेड, फोल्डेबल बेड, व्हेंटीलेटर, मॉनिटर, वॉशिंग मशीन, फ्रिज, डेफि ब्रिलेटर, बॉडी बॅग, एअर निगेटीव्ह आयॉन जनरेटर, ऑक्सिजन सिलेंडर, लॅरिन्गोस्कोप, हॅन्डरब, स्वाब बुथ, सीरींज पंप, फोगर मशीन, कर्टन ट्रक, मेडिकल गॅस लाईन विथ बेड हेड पॅनल, बीपीसी विथ फ्लोमीटर विथ हमडिफिअर बॉटल सेट, मायक्रो थेटोस्कोप, व्हिल चेअर, इलेक्ट्रिक सक्शन मशिन, लेरींगोस्कोप एलएडी आदी साहित्यही पुरविण्यात आले आहे. =====व्हटीएम कीट १,११५पीपीई कीट ३८,०२०एन 95 मास्क ३२,९३०डिस्पोजेबल मास्क १,१०,७००कापडी मास्क ११,४१३तीन लेयर मास्क ५३,०००हॅन्डग्लोव्हज २०,५८०सोडियम हायपोक्लोराईड (लि.) १,१६०सॅनिटायझर (लि.) १४,१५५सॅनिटायझर (बाटल्या) ९,४१६ग्लुकोमीटर (स्ट्रिप) ४०००फिंगर पल्स ऑक्स्मििटर २,८१५फेस शिल्ड ८,५२०रेस्प्रिंट १,०००थर्मामीटर ७८२व्हेंटीलेटर २९

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय