शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

कंत्राटी कामगारांसाठी संसदेत विधेयक मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:32 IST

अजित अभ्यंकर : कोरेगाव भीमा येथील मेळाव्यास दहा हजार कामगार उपस्थित

कोरेगाव भीमा : कारखान्यात मालकांपेक्षा मनोविकृत व्यवस्थापनच कामगारांची पिळवणूक करत असल्याने अशा व्यवस्थापनाविरुद्धच लढण्याची वेळ आली असून, कामगार लढ्याबाबत योग्य नियोजन हवे. त्याचबरोबर शिकाऊ कामगार म्हणजेच निमकामगारांना इतर कामगारांप्रमाणेच पीएफ, ईएसआयसह सर्व कायदे लागू असल्याचे सांगत कंत्राटी कामगारांविषयी संसदेत खासगी विधेयक लवकरच मांडले जाणार असल्याचेही ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी सांगितले.

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथिल ट्रॅन्टर कारखान्यातील १७ कायम कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने गेल्या अडीच महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आल्यानंतर गत ८० दिवसांपासून ट्रॅन्टर कारखान्याच्या गेटवर कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, रांजणगाव, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, भोसरी, चाकण, खेडसह शिरवळ औद्योगिक परिसरातील दहा हजार कामगार पायी रॅलीद्वारे येऊन गौरीनंदन मंगल कार्यालयात कामगारांचा मेळावा झाला.या मेळाव्याप्रसंगी अजित अभ्यंकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, मारुती भापकर, रमेश सातपुते, अविनाश वाडेकर, दत्तात्रय येळवंडे, राजेंद्र दरेकर, गणेश जाधव, दिगंबर पाटील, किरण देशमुख, नारायण हरगुडे, कैलास मुंगशे, रमेश बनकर आदीउपस्थित होते.यावेळी किशोर ढोकले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या कामगारांची गुलामीकडे वाटचाल चालू असून महागाईच्या प्रमाणात पगार कमी होत चालले आहेत. शासनाच्या कामगारविरोधी धोरणांमुळे व भांडवलदारांच्या दबावाखाली कंत्राटीप्रमाणेच कायम कामगार पद्धतशीरपणे संपवला जातोय.यावेळी अप्पर कामगार आयुक्त शैलेश पोळ व उपायुक्त पनवलकर यांना कामगारांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन यावेळी दिले. प्रास्ताविक राजेंद्र दरेकर यांनी केले. सूत्रसंचलन चंद्रकांत कदम तर आभार रूपेश वरपे यांनी मानले.लढा देण्यासाठी एकत्र या..४कारखान्यात महिलांना कोणत्याही सुविधा तर दिल्या जातच नाही शिवाय मुद्दाम रात्रपाळीला बोलावले जाते, अशा अमानवी कारखानदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांविरोधात पद्धतशीरपणे लढा देण्याची वेळ आली असल्याचे सांगत ऐन दिवाळीत १७ कामगारांना बाहेर काढणाºया टॅन्टर कंपनीचा रोग इतर कारखान्यात पसरू नये, यासाठी आपण एकत्र लढायला हवे. या विरोधात फौजदारी कारवाईसह सर्वकष लढा देण्यासाठी एकत्र या, असेही आवाहन त्यांनी केले.४राष्ट्रवादी कामगार संघटनेचे शिवाजीराव खटकाळे म्हणाले, कामगारांचे भवितव्य अंधारात असून परस्पर मतभेद बाजुला ठेवून एकजुट ठेवली तरच कामगारांचे प्रश्न सुटतील.४निमकामगारांच्या हितासाठी कारखाना मालकावरही शासनाने निर्बंध ठेवत कामगार कमी करताना परवानगीही बंधनकारक केली पाहिजे. तर मारुती भापकर यांनी भांडवलदारांच्यादबावामुळे सरकारकडून शेतकरी, कामगारांचे केवळ शोषण होत असल्याने यापुढे सर्व घटकांना एकत्र करून लढा द्यावा लागेल, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणे