शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता नाकारून सेवा करणे हा मोठा त्याग - उल्हास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:00 IST

‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.काँग्रेस भवन येथे विविध क्षेत्रातील महिलांना सेवाव्रत पुरस्कार देऊन काँग्रेसच्या मावळत्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी जैनब बागवे यांनी केक कापला. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार, मुस्लिम सत्यशोधक विचार मंचच्या डॉ. बेनझीर तांबोळी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. शीतल धडफळे-महाजन, पत्रकार अंजली खमीतकर, अभिनेत्री अदिती द्रविड, गायिका जुईली जोगळेकर, नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फॅशन डिझायनर निवेदिता साबू, बॉक्सर मिराज जहांगिर शेख या महिलांना सेवाव्रत पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचवेळी ७१ अंगणवाडी शिक्षिका व सेविका यांचाही गौरव करण्यात आला. शहराध्यक्ष बागवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पवार यांनी या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पोलादी कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. पुरस्कार विजेत्या उज्ज्वला पवार यांना काँग्रेस भवनसारख्या ऐतिहासिक वास्तूमध्ये सोनिया गांधी यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आहे ही फार आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. डॉ. धडफळे, अंजली खमीतकर, डॉ. तांबोळी, साबू, मोघे यांनीही मनोगत व्यक्त केले. शहर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रमेश अय्यर यांनी आभार मानले. माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे अभय छाजेड, नगरसेवक अजित दरेकर व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSonia Gandhiसोनिया गांधी