पुणे : कोरोनाच्या काळात जिथे शाळा-महाविद्यालय बंद होते व जाहीर कार्यक्रम, शिबिरांसाठी बंदी होती तिथे राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो कॅडेट्स मधून निवडक कॅडेट्स पुण्यात आणणे, त्यांचे महिनाभर प्रशिक्षण शिबिर घेणे आणि सहीसलामत दिल्लीत महिनाभर ठेवणे हेच यंदाचे सर्वांत मोठे आव्हान होते ते महाराष्ट्र कॉन्टीजनने यशस्वीपणे पेलले व कॅडेट्सनेही त्या कसोटीवर खरे उतरत मोठी कामगिरी करून दाखविली याचा मोठा आनंद आहे, असे प्रतिपदान एनसीसी पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील लिमये यांनी केले.
प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी दिल्लीतील राजपथावरील संचलन आणि विविध स्पर्धांसाठी गेलेला महाराष्ट्राचा संघ आज पुण्यात परतला. या संघाच्या निवडीपासून ते त्यांचे प्रशिक्षण आणि दिल्लीला पाठविण्याची जबाबदारी पुणे ग्रुपकडे होती. ही जबाबदारी चोख पार पाडत महाराष्ट्राचा संघ सोमवारी मुंबईत दाखल तेथे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यावतीने त्यांच्या स्वागत आणि अभिनंदनाचा जंगी कार्यक्रम झाल्यानंतर हा संघ मंगळवारी रात्री पुण्यात दाखल झाला. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी खास मेजवाणी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजिले होते. त्यावेळी ब्रिगेडिअर लिमये यांच्या हस्ते सर्व कॅडे़ट्सला भेटवस्तू व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कर्नल विनायक चव्हाण, कर्नल प्रशांत नायर, मेजर आरुषा शेटे, लेफ्टनंट विवेक बळे, नायब सुभेदार किरण माने, लष्कर संजू जगताप, गिरीश चव्हाण
आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन कशीश मेटवान आणि विवेकसिंग चंदेल या कॅडेट्सनी केले.
--
चौकट
--
कॅडेट्सच्या मेहनतीनंतर आज त्यांच्या यशाच्या उत्सवानिमित्त खास सांसकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एअर विंगचे कमांडर --- यांचे चिरंजीव --- याने गिटारीचे धून आणि गाणी सादर करुन सर्वांची दाद मिळविली.
--
--