शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या बाक खरेदीमध्ये मोठा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:54 IST

ठेकेदाराने १० हजार ९०० रुपयांचे बाक म्हणून पुरवठा केलेले बाक चायनिज बनावटीचे असून त्याची बाजारातील किंमत केवळ ४ हजार ५०० रुपयेच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशहरात सर्वत्र चायनिज बनावटीच्या बाकांचा पुरवठा चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व त्यांना पाठींशी घालणा-या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी

पुणे : शहरामध्ये महापालिकेच्या वतीने सोसायट्या, चौक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, उद्याने येथे नागरिकांना बसण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाक खरेदी केले जातात. बाकांची खरेदी करताना बाजारातील मूळ किमतीपेक्षा वाढीव किंमत मोजण्यात आल्याचे समोर येत आहे. महापालिकेच्या वतीने एका बाकची किंमत १० हजार ९०० रुपये इतकी ठरवली असताना प्रत्यक्षात ठेकेदाराकडून चायनिज बनावटीचे चार हजार रुपयांचे बाकचा पुरवठा करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य उमेश गायकवाड यांनी केला आहे.     शहरातील विविध सोसायट्या, चौक, महापालिकेची उद्याने, ज्येष्ठ नागरिक कट्टा, सार्वजनिक वाचनालये आदी विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने बाक बसविण्यात येतात. यासाठी निविदा काढून ठेकेदारामार्फत संपूर्ण शहरामध्ये या बाकांचा पुरवठा करण्यात येतो. तीन वर्षांपूर्वी ठेकेदाराला एका बाकाची तेरा हजार इतकी दिली जात होती. यावरून बरेच आरोप झाल्यानंतर ती बदलून दहा हजार नऊशे इतकी ठरली होती. त्यानंतर सुद्धा किंमत किती वाढवून लावलेली आहे हे आता समोर येत आहे. ही किंमत ठरवताना एका विशिष्ट कंपनीचा बाक असल्याचे सांगण्यात आले. परंतू, प्रत्यक्ष पुरवठा करताना दुस-याच कंपनीचे बाक पुरविण्यात आले. ठेकेदाराने १० हजार ९०० रुपयांचे बाक म्हणून पुरवठा केलेले बाक चायनिज बनावटीचे असून, त्याची बाजारातील किंमत केवळ ४ हजार ५०० रुपयेच असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.     याबाबत गायकवाड यांनी सांगितले की, कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागत बाकचा पुरवठा केला जात असताना बाकांच्या दर्जाची तापसणी केली. याबाबत अधिक तपास केल्या असता संपूर्ण शहरामध्ये चायनिज बनावटीचे बाक पुरविण्यात आले असून, गेल्या तीन वर्षांपासून हा उद्योग सुरु असल्याचे समोर आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गेल्या तीन वर्षांपासूनच्या बाक खरेदीची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व त्यांना पाठींशी घालणा-या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली.--------------------बाक खेरदीची व दराची माहिती मागवलीस्थायी समितीच्या बैठकीत सदस्य उमेश गायकवाड यांनी शहरातील बाक खरेदीचा विषय उपस्थित केला. यामध्ये त्यांनी ठेकेदाराकडून पुरविण्यात येत असलेल्या बाकांची बाजारात किंमत केवळ साडे चार हजार असताना महापालिका तब्बल १० हजार ९०० रुपये देते असे सांगितले. या प्रकरणात संबंधित अधिका-यांना गेल्या तीन वर्षांतील बाक खरेदीची माहिती व ठेकेदाराला देण्यात आलेले दर मागविण्यात आले असून, पुढील आठवड्यात होणा-या बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.- योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका