शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 11:13 IST

तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी; त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक

ठळक मुद्दे१८ जणांचा शोध सुरू :कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे

पिंपरी:  दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आता  त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली असूनत्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या 'एनआयव्हीकडे' तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.    हे लोक किती जणांच्या  संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे.  आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीग ए जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच  पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे.   महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत ३२ नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने उद्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. उर्वरीत १८ जणांचा शोध घेत आहोत. त्यांची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. तसेच हे लोक शहरात कधी आले आहेत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMuslimमुस्लीमshravan hardikarश्रावण हर्डिकर