शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 13:46 IST

गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून नागरिकांनी धडा शिकला पाहिजे..

ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात रुग्णसंख्या होतीय कमी 

पुणे : पुण्यासह राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नसला तरी कुटुंबाच्या वैयक्तिक पातळीवर मात्र मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांच्या घरी गेल्यानेच शहर आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढली असा दावा महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने केला आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, दररोज बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील समाधानकारक असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विभागीय आयुक्त राव यांनी  पुणे आणि विभागीचा कोरोनाची सध्यस्थितीत आणि उपाययोजनाबाबत माहिती दिली.यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख उपस्थित होते. यावेळी राव यांनी सांगितले, गणेशोत्सवानंतर पुण्याचा पाॅझिटिव्हीटी रेट 30 टक्क्यांच्या पुढे गेला होता. परंतु हा पिक टाईम आता संपुष्टात येत असून, पुणे शहराचा पाॅझिटिव्हीटी रेट 26 टक्क्यांपर्यंत तर ग्रामीण भागाचा हाच दर 20-21 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत बेड्स ची मागणी आणि नागरिकांकडून येणारे फोन देखील खूप कमी झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून नागरिकांनी धडा शिकला पाहिजे. आगामी काळात नवरात्रोत्सव आणि दिवाळीत प्रचंड खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन देखील राव यांनी केले. पुण्यात गेल्या पंधरा दिवसांत एकूण ऑक्सिजन बेड्स च्या संख्येत तब्बल 900 पर्यंत वाढ करण्यात आली असून, यात 69 आयसीयु बेड्स वाढविण्यात आल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले. तसेच 2-3 ऑक्टोबर पासून ससून रुग्णालय देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. पुण्यातील जम्बो हाॅस्पिटल दोन दिवसांत पूर्ण 800 बेड्स च्या क्षमतेने सुरू होत असून, रुग्ण वाढतील तसे दाखल करून घेण्यात येईल असे राव यांनी सांगितले. ------मान्सून संपल्यानंतर पुण्यातील उद्याने सुरू करण्याबाबत विचार पुण्यात अद्याप ही सार्वजनिक ठिकाणे सरसकट सुरू करण्याची परिस्थिती नाही. सध्या मान्सून सुरू असून,  कोरोना सोबतच इतर आजार देखील होण्याची शक्यता असते. तसेच सर्व उद्यानांमध्ये असलेल्या ओपन जिम्समुळे देखील कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच सध्या तरी उद्याने सुरू करण्याचा कोणताही विचार नाही, 'पण मान्सून हंगाम संपल्यानंतर याबाबत विचार करू असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या