शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्र क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचाय : डॉ. टेसी थॉमस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:06 IST

प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते..

ठळक मुद्देकीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कार 

पुणे : ‘प्रयत्नांना आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाल्यास निश्चितपणे यशस्वी होता येते. भारताने अण्वस्त्र क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असली तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे, असे सांगून बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन आॅफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांनी अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पातील अनुभव विशद केले. कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा बंगळूरू येथील क्षेपणास्त्र वैज्ञानिक आणि भारताच्या अग्नीपुत्री (मिसाईल वुमन आॅफ इंडिया) डॉ. टेसी थॉमस यांना तर ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार’ पुणे येथील आर्टिस्ट्रीच्या वीणा गोखले आणि पुणे येथील जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांना विभागून देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर मुक्ता टिळक,आयोजक सुरेश रानडे, तसेच यंदाच्या आदर्श सहचारिणी पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पत्नी वैशाली माशेलकर, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या पत्नी संजीवनी मुजुमदार आणि ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. थॉमस म्हणाल्या, ‘सतत शिकत राहायचे ही आईची शिकवण आणि एका यशानंतर आता पुढे काय, याचा सतत ध्यास घ्यायचा असे प्रोत्साहन देणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम या दोन व्यक्तींनी माझे आयुष्य ख-या अर्थाने घडवले. पालकांच्या दृष्टिकोनाचा तुमच्या जडणघडणीवर खूप परिणाम होत असतो. कुटुंब गरीब आहे की श्रीमंत, याहीपेक्षा ते शिक्षित आणि ध्येयवादी आहे का, हे अधिक महत्त्वाचे असते.’ श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘समाजाच्या अनेक क्षेत्रातील व्यक्तींना मदतीची गरज असते. अनेक व्यक्ती आणि संस्था त्यांच्यासाठी काम करतात. आपण प्रत्यक्षपणे काम करू शकत नसलो, तरी अशा व्यक्ती आणि संस्थांना जमेल ती मदत करणे आपले कर्तव्य आहे. आपले दान सत्पात्री जावे, अशी प्रत्येकाची भावना असते.’ यावेळी मुक्ता टिळक  म्हणाल्या, ‘महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजातील अनेक वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. बालके, किशोरवयीन मुले-मुली, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक घटकांच्या विविध समस्या सोडविणे गरजेचे आहे.’सुरेश रानडे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. रवि नातू यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे