शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भोर प्रशासनाचा मोठा निर्णय! गर्दी टाळण्यासाठी रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यांवर पर्यटनाला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 15:04 IST

दरवर्षी पावसाळ्यात या गडांवर पर्यटक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात, कोरोना आणि गडांवरील अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय

ठळक मुद्देसेल्फी काढताना होणाऱ्या धावपळी पाय घसरुन पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटनांकडे पर्यटक दुर्लक्ष करू लागले

भोर: सध्या पावसाळा सुरू झाला आहे. यामुळे दुर्गभ्रमंतीसाठी अनेक पर्यटक किल्यांवर येतात. मात्र, दाट धुके, वादळी पाऊस, वारा यामुळे दुर्घटना होत असतात. तसेच कोरोना मुळे गडकिल्यांवरील गर्दी टाळण्यासाठी भोर तालुका प्रशासनाने रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यावर पर्यटनाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तहसिलदार अजित पाटील यांनी सांगितले.

मागील आठवड्यात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्यावर बंदी घातली होती. तर वाई आणि भोर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंजळ गडावर फिरायला गेलेला दहा वर्षाचा मुलगा पाय घसरुन पडल्याने जखमी झाला होता. अशा घटना वारंवार घडतात. या घटना होऊ नये या साठी प्रशासनाने दुर्गभ्रंमतीवर बंदी घातली आहे. वेल्हेतालुक्यातील किल्यावरील पर्यटनाला बंदी घातल्याने अनेक पर्यटक भोर तालुक्यातील रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्यावर एकच गर्दी करु लागले होते. त्यामुळे सोमवारपासून भोर तालुक्यातीला किल्यावर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.

भोर तालुक्यात दर वर्षी पावसाळयात धबधब्यावर भिजण्यासाठी आणि पर्यटनास वरंध घाट, आंबाडखिंड घाट भाटघर आणी निरादेवघर धरणावरही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सेल्फी काढताना होणाऱ्या धावपळी पाय घसरुन पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटना घडू शकतात. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असतात. यामुळे या गोष्टींचा विचार करुन भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्यावर आणी पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आली आहे.

वरंघ घाट व आंबाडखिडघाट परिसरात पडतात दरडी

भोर तालुक्यात पावसाळयात हिरवेगार डोंगर वृक्ष वेली डोगरातुन फेसाळत पडणारे धबधबे आहेत. हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, डोंगरी भाग असल्याने पावसाळयात भोर महाड रस्त्यावरील वरंध घाट व भोर मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजbhor-acभोरGovernmentसरकार