शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! कुख्यात गँगस्टर निलेश घायवळला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 15:49 IST

गुन्हे शाखा अन् भिगवण पोलिसांनी कारवाई 

बारामती : पुणे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. या फासामध्ये कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ हा अडकला आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि भिगवण पोलिसांनी संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २) घायवळ यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली. 

गँगस्टर घायवळ हा सोनेगाव (ता. जामखेड) या त्याच्या मूळगावी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून समजली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी अचानक छापा टाकत मंगळवारी सायंकाळी त्याला अटक केली. घायवळ याच्यावर डिसेंबर २०२० मध्ये भिगवण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल होता. याशिवाय घायवळ याच्या विरुध्द मोक्का,खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,खंडणी,दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधिक्षकांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घायवळला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा आदेश दिला आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे  आदींच्या पथकाने कि कारवाई केली. घायवळची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.—————————————

टॅग्स :BaramatiबारामतीArrestअटकPoliceपोलिस