शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचे लवकरच भूमिपूजन, पुण्यात ६ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:33 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरामध्ये तब्बल ६ हजार घरे बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून येत्या आॅगस्टमध्ये प्रत्यक्ष भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेला गती देण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला.

पुणे  - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरामध्ये तब्बल ६ हजार घरे बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून येत्या आॅगस्टमध्ये प्रत्यक्ष भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेला गती देण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सोबत बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यामुळे महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सर्वसामान्य कुटुंबाला परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना हाती घेतली आहे. या अतंर्गत एकट्या पुणे शहरामध्ये तब्बल ६ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध होती. दहा लाखांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पात्र नागरिकांना साडेसात लाख रुपये बँकांकडून कर्जपुरवठ्याने उपलब्ध करावे लागतील. त्यामुळे नागरिकांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी महापालिका समन्वय करणार असल्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.पालिकेने हडपसर व खराडी या दोन ठिकाणी ३ हजार घरांचा प्रकल्प आराखडा तयार केला होता. त्याला राज्य व केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून, आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रशासनाने आणखी सव्वातीन हजार घरांचा आणखी एक प्रकल्प आराखडा तयार केला आहे. त्यात वडगाव खुर्द येथे एका प्रकल्पाचा समावेश आहे. त्यात पार्किंगसह दहा मजल्यांच्या ९ इमारती उभ्या राहणार असून, त्यात १ हजार ७१ इतक्या सदनिका तयार होणार आहेत. उर्वरित तीन प्रकल्प हडपसर येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. त्यात हडपसर सर्व्हे नं. ७६ या ठिकाणी होणाºया प्रकल्पात एकूण १६ इमारती उभ्या राहणार असून, त्यामधील सदनिकांची संख्या १ हजार ९०४ इतकी आहे. सर्व्हे नं. १०६ अ पार्ट १८ अ या ठिकाणी ४ बिल्डिंग होणार असून, त्यात १४४ सदनिका होणार आहेत. तर सर्व्हे १०६ अ पार्ट १२ अ या ठिकाणी २ बिल्डिंग उभ्या राहणार असून, त्यात १०० सदनिका असणार आहेत.४१ हजार ७०० आॅनलाइन अर्ज, १८ हजार ८०० वैधपंतप्रधान आवास योजनेंतर्गत परवडणाºया घरांसाठी महापालिकेडे ४१ हजार ७०० अर्ज आॅनलाइन पद्धतीने आले होते. मात्र, त्यामध्ये कागदपत्रांसह प्रत्यक्षात फक्त २६ हजार ७०० अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले. या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यामधील ७ हजार ८०० अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता पात्र अर्जांची संख्या १८ हजार ८०० इतकी उरली आहे. या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात ६ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेHomeघर