शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

महिलांचे शोषण करणा-या भोंदूबाबाला अटक; महिलांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 22:39 IST

विविध प्रकारच्या अडचणींनी ग्रस्त असणा-या महिलांचे शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करणा-या भोंदूबाबाला महिलांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पुणे : कौटुंबिक समस्या व विविध प्रकारच्या अडचणींनी ग्रस्त असणा-या महिलांचे शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करणा-या भोंदूबाबाला महिलांनीचांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार नाना पेठेत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास घडला. नंदकुमार वसंत भागवत (वय ६८)  आणि त्याचा मुलगा अभिजित उर्फ चारु नंदकुमार भागवत (वय ३०, रा. आझाद गल्ली, नाना पेठ), अशी त्यांची नावे आहेत.याप्रकरणी एका वृद्ध महिलेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली. या महिलेस कौटुंबिक समस्येने ग्रासले होते. नंदकुमार भागवत हे नाथाची गादीचालवितात. ही महिला अभिजित भागवत या भोंदूबाबाच्या नाना पेठेतील घरी गेली. त्याने महिलेची समस्येतून सुटका करण्याचा बहाणा करून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे व्हिडीओ चित्रीकरण करून तिची मुलगी व जावयाला दाखविण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.दरम्यान, त्याने हा प्रकार कोणालाही न सांगण्याच्या अटीवर महिलेची सदनिका स्वत:च्या नावे करण्याचा तगादा लावला होता. याच पद्धतीने अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांचे शोषण करण्याचे काम तो करीत होता. हा सर्व प्रकार फिर्यादींनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख रोहिणी कोल्हाळ यांना सांगितला. दरम्यान, या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी रविवारी भोंदूबाबाच्या घरी जाऊन त्यास चांगलाच चोप दिला. त्यानंतर भोंदू बाबा व त्याच्या वडिलांना समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महा. नरबळी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर या दोघांनी आपल्यालाही फसवणूक आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगणा-या आणखी दोन महिला समोर आल्या आहेत.लखोबा लोखंडेचा अवतारलखोबा लोखंड या भोंदूने आपण कृष्णाचे अवतार असल्याचे सांगून तू माझी राधा असे सांगत महिलांना ठगविले होते. त्याचप्रमाणे भागवत याने या महिलेला तू माझ्या मागच्या सात जन्माची सहचरिणी पार्वती असून मला नवनाथाचा दृष्टांत झाला आहे, असे सांगून तिला भावनाविवश करीत तिच्यावर अत्याचार करीत गेला होता. तसेच मुल होत नाही म्हणून त्याच्याकडे येणा-या महिलांना त्याने नग्नावस्थेत आंघोळ घालणे तसेच त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, भूतबाधा झाल्याचे सांगून डोक्यावरचे केस उपटणे, भस्म देणे असे प्रकार तो करीत असे