महिलांचे शोषण करणा-या भोंदूबाबाला अटक; महिलांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 10:38 PM2019-11-03T22:38:55+5:302019-11-03T22:39:03+5:30

विविध प्रकारच्या अडचणींनी ग्रस्त असणा-या महिलांचे शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करणा-या भोंदूबाबाला महिलांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Bhondubaba arrested for exploiting women | महिलांचे शोषण करणा-या भोंदूबाबाला अटक; महिलांनी दिला चोप

महिलांचे शोषण करणा-या भोंदूबाबाला अटक; महिलांनी दिला चोप

Next

पुणे : कौटुंबिक समस्या व विविध प्रकारच्या अडचणींनी ग्रस्त असणा-या महिलांचे शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करणा-या भोंदूबाबाला महिलांनी
चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार नाना पेठेत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास घडला. नंदकुमार वसंत भागवत (वय ६८)  आणि त्याचा मुलगा अभिजित उर्फ चारु नंदकुमार भागवत (वय ३०, रा. आझाद गल्ली, नाना पेठ), अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी एका वृद्ध महिलेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली. या महिलेस कौटुंबिक समस्येने ग्रासले होते. नंदकुमार भागवत हे नाथाची गादी
चालवितात. ही महिला अभिजित भागवत या भोंदूबाबाच्या नाना पेठेतील घरी गेली. त्याने महिलेची समस्येतून सुटका करण्याचा बहाणा करून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे व्हिडीओ चित्रीकरण करून तिची मुलगी व जावयाला दाखविण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, त्याने हा प्रकार कोणालाही न सांगण्याच्या अटीवर महिलेची सदनिका स्वत:च्या नावे करण्याचा तगादा लावला होता. याच पद्धतीने अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांचे शोषण करण्याचे काम तो करीत होता. हा सर्व प्रकार फिर्यादींनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख रोहिणी कोल्हाळ यांना सांगितला. दरम्यान, या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी रविवारी भोंदूबाबाच्या घरी जाऊन त्यास चांगलाच चोप दिला. त्यानंतर भोंदू बाबा व त्याच्या वडिलांना समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महा. नरबळी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर या दोघांनी आपल्यालाही फसवणूक आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगणा-या आणखी दोन महिला समोर आल्या आहेत.

लखोबा लोखंडेचा अवतार
लखोबा लोखंड या भोंदूने आपण कृष्णाचे अवतार असल्याचे सांगून तू माझी राधा असे सांगत महिलांना ठगविले होते. त्याचप्रमाणे भागवत याने या महिलेला तू माझ्या मागच्या सात जन्माची सहचरिणी पार्वती असून मला नवनाथाचा दृष्टांत झाला आहे, असे सांगून तिला भावनाविवश करीत तिच्यावर अत्याचार करीत गेला होता. तसेच मुल होत नाही म्हणून त्याच्याकडे येणा-या महिलांना त्याने नग्नावस्थेत आंघोळ घालणे तसेच त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, भूतबाधा झाल्याचे सांगून डोक्यावरचे केस उपटणे, भस्म देणे असे प्रकार तो करीत असे

Web Title: Bhondubaba arrested for exploiting women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.