शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-पाटस प्रतिदिन ६५०० टन ऊसगाळप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 02:35 IST

भीमा पाटस कारखाना प्रतिदिन ६५00 टन ऊस गाळप करणार असल्याचे असे प्रतिपादन दौंडचे आमदार तथा भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले.

केडगाव : भीमा पाटस कारखाना प्रतिदिन ६५00 टन ऊस गाळप करणार असल्याचे असे प्रतिपादन दौंडचे आमदार तथा भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले. पाटस ता. दौंड येथे भीमा पाटस कारखान्याच्या ३८ व्या गाळप शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना कुल म्हणाले की, हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झाली आहे. चालु वषीर्चा हंगाम हा ऐतिहासिक हंगाम आहे. येत्या १ नोव्हेंबरपासुन ३00 कामगारांना कायम करत आहोत. कामगारांनी संस्थेशी प्रामाणिक राहावे. गेल्या वर्षी ऊसाची रिकव्हरी कमी राहील्याचा फटका बसल्याने यावर्षी रिकव्हरी ११.५0 होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या गळीत हंगामाचा ३५ कोटी फायदा झाल्याने कजार्चे पुनर्गठन करता आले.तालुक्यातील शेतकर्यांच्या मालकीचा हा एकमेव कारखाना असल्याने सर्वांनी सहकार्य केल्यास गाळपाचा उच्चांक होईल. महाराष्ट्र शासनाने इतिहासात राजगड कारखान्यानंतर भीमा पाटस या २ कारखान्यांना मदत केली आहे. इथेनॉल, कोजन व साखरेचे उत्पादन पहिल्या दिवसांपासुन घेणार असल्याचे मत कुल यांनी व्यक्त केले.यावेळी प्रेमसुख कटारिया म्हणाले की, कारखान्याला सहकार्य करण्याऐवजी कारखाना बंद पाडुन राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा डाव होता. यंत्रणा सज्ज असल्याने डाव धुळीस मिळाला आहे. उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक विकास शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार रंजना कुल, नगराध्यक्षा शितल कटारीया व तालुक्यातील सर्व महिला पदाधिकार्यांना मोळी टाकण्याची संधी मिळाली.यावेळी सुरेश शेळके, आबासाहेब निबे, निळकंठ शितोळे, माऊली ताकवणे, पूनम दळवी, धनाजी उपस्थित होते.पेमेंट वेळेवर मिळण्यासाठी ४ प्लँन तयारआमदार राहुल कुल म्हणाले की, गेल्या वर्षी साखरेचे दर कोसळल्याने वेळेत सभासदांचे पैसे देवु शकलो नाही. यावर्षी सभासदांचे बील दर पंधरवड्याला दिले जाईल. यासाठी अ‍े. बी. सी. डी. असे ४ प्लॅन आहेत.त्यामुळे बिल वेळेतच मिळेल असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे