शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात क्रेन तुटून अपघात, नऊ कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 23:46 IST

इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाला. 

अकोले : इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाला. निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत तावशी ते डाळज बोगद्याचे काम सुरू आहे. आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास बोगद्यातील काम उरकून ९ परप्रांतीय कामगार क्रेनमध्ये वर येत होते. यावेळी क्रेन निम्म्यापर्यंत आल्यावर वायररोप तुटला. त्यामुळे हे कामगार २०० फूट खोल बोगद्यात कोसळले. त्यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेश, ओडिसा, आंधप्रदेश येथील हे कामगार आहेत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५ परप्रांतीय कामगारांचे मृतदेह वर काढण्यात यश आले. आणखी चार कामगारांचे मृतदेह वर काढण्यासाठी प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस  प्रशासन, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती समजताच अकोले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकोले परिसरातील या प्रकल्पाच्या शाफ्ट नं. ५ येथे ही घटना घडली.

 

टॅग्स :Accidentअपघात