शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजींच्या भक्ती-शक्ती संगमावर पोलिसांचा ‘वॉच’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:42 IST

यंदा पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचे पथक सहभागी होणार असून श्री शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.   

ठळक मुद्देगेल्या वर्षी पालखी सोहळ्यात श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तलवारी घेऊन सहभागी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा

पुणे : श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने यावर्षी देखील वारकरी-धारकरी संगमाचे नियोजन करण्यात आले असून संभाजी भिडे गुरूजी आपल्या कार्यकर्त्यांसह त्यात सहभागी होणार आहेत.  यापार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात तीक्ष्ण शस्त्रे घेऊन सहभागी होऊ नये, अशी नोटीस पुणे पोलिसांकडून श्री शिव प्रतिष्ठानला बजावण्यात आली आहे. तर धारक-यांनी कोणतेही शस्त्र घेऊन सहभागी होऊ नये, आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.    कार्यकर्त्यांनी शस्त्र न बाळगणे, वारक-यांना त्रास होईल, असे वर्तन न करण्यासारख्या विविध अटी घालत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. गेल्या वर्षी पालखी सोहळ्यात श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तलवारी घेऊन सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज (७ जुलै) शहरात आगमन होणार आहे. संघटनेच्या नियोजनानूसार जंगली महाराज मंदिरात दुपारी दोन वाजल्यापासून धारकरी जमा होणार आहेत. यानंतर चार वाजता भिडे गुरुजी तेथे येऊन धारक-यांना मार्गदर्शन करुन संचेती चौकात पालखीच्या स्वागतासाठी जातील. तेथे प्रथम तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यावर पालखीचे दर्शन घेतील. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महारांच्या पालखीचे दर्शन घेतले जाईल. पालखीच्या पुढे धारकरी सहभागी होणार नाहीत. मात्र, श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यावर त्यामागे धारकरी डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहे.    धारकरी कोणत्याही प्रकारचे शस्त्र सोबत आणणार नाहीत तसेच वारक-यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अर्वाच्च घोषणा द्यायच्या नाही, असे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संजय जढर यांना नोटीस पाठविली आहे. संघटनेच्या लोकांनी पालखीची वर्षानुवर्षांची परंपरा मोडत १८ जून २०१७ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबविली होती. संघटनेचा हा प्रकार तीन वर्षांपासून सुरू असून त्यांना प्रतिबंध करण्याचे पत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने पोलिसांना दिल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. यापार्श्वभूमीवर यंदा पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचे पथक सहभागी होणार असून श्री शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.   

        

टॅग्स :PuneपुणेPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPoliceपोलिस