शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजी यांच्याा समर्थनार्थ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:10 IST

लालमहालापासून सकाळी साडेदहा वाजता मोर्चा निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता़.त्यासाठी संयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती़ .

ठळक मुद्देपुणे शहरातून संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ बुधवारी मोर्चा काढण्यात येणार होता़ शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली

पुणे : श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ बुधवारी पुण्यात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरुन पोलिसांनी परवानगी नाकारली आहे़.कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केल्यानंतरही श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करण्यात येत नाही़. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबई मोर्चा काढण्यात आला़ होता़.त्याला विरोध करण्यासाठी आणि संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ पुणे शहरातून बुधवारी मोर्चा काढण्यात येणार होता़. मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार होते़. लालमहालापासून सकाळी साडेदहा वाजता मोर्चा निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता़.त्यासाठी संयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती़ .पुणे पोलीस दलाच्या दक्षिण प्रादेशिक विभागाने मंगळवारी सायंकाळी या मोर्चाला परवानगी नाकारली़. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी सांगितले की, शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे़ तशी संयोजकांशी चर्चा करण्यात आली आहे़.मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर काही प्रमुख कार्यकर्ते शनिवारवाड्याच्या प्रांगणात जमणार आहेत़. त्यानंतर संयोजक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले जात आहे़. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जरी संभाजी भिडेंबाबत कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले असले तरी संभाजी भिडे हेच कोरेगाव-भीमा दंगलीचे खरे सुत्रधार असून त्यांच्या कार्यकत्यांनी बैठका घेऊन सामाजिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड