शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जनतेची भाऊबीज हा आयुष्यातील आनंदाचा अनमोल ठेवा; अग्निशामक दलासह अनोखी भाऊबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 16:03 IST

कै. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्निशामक दलाच्या जवानांना ओवाळून त्यांच्यासाठी भाऊबीजेचा सण अविस्मरणीय करण्यात आला.

ठळक मुद्देभोई प्रतिष्ठानच्या वतीने साजरी झालेल्या भाऊबीजेने अग्निशामक दलाचे जवान भारावून गेले.मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिरखुर्माचा आस्वाद जवानांनी घेतला.

पुणे : एकीकडे सर्व जनता दिवाळीचा आनंद लुटत असताना अग्निशामक दलाचे जवान मात्र आपले कर्तव्य बजावत असतात. इतरांची दिवाळी सुखकर आणि उत्साहात जावी याकरिता त्यांना कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करण्यापासून वंचित राहावे लागते. स्वत:च्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी करता येत नाही. ही भावना लक्षात घेऊन भोई प्रतिष्ठानच्या वतीने साजरी झालेल्या भाऊबीजेने जवान भारावून गेले...सर्वांचेच डोळे नकळतपणे पाणावले. ही ‘भाऊबीज’ प्रत्येक अग्निशामक दलाच्या आयुष्यातील आनंदाचा अनमोल ठेवा आहे, असे भावोद्गार पुणे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी काढले.कै. शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्निशामक दलाच्या जवानांना ओवाळून त्यांच्यासाठी भाऊबीजेचा सण अविस्मरणीय करण्यात आला. याप्रसंगी पालकंत्री गिरीश बापट, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुप्त वार्ता विभाग) चंद्रशेखर दैठणकर, पोलीस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, उल्हास पवार, अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री जयमाला इनामदार, मुस्लिम विचारवंत अनिस चिश्ती, मुश्ताक पटेल, इकबाल दरबार, तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष प्द्मा गाबरेल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, गुरूजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, उद्योजक दादा गुजर, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणारे अग्निशामक दलाचे फायरमन राजीव टिळेकर व बाबू शितकाल यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. अग्निशामक दलाच्या कर्तव्यपर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणेकरांच्या वतीने गेली वीस वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे मुश्ताक पटेल, युसुफभाई चावीवाले व माजी नगरेसवक रशीद शेख यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिरखुर्माचा आस्वाद जवानांनी घेतला. 

टॅग्स :diwaliदिवाळीPuneपुणे