पुणे : गेल्या दोन दशकांत पुणेकरांनी माजी खासदार सुरेश (भाई) कलमाडी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचा कारभार पाहिला. परंतु, पुणे शहराची थेट जाण असलेले आणि नगरसेवक ते आमदार म्हणून राजकीय वाटचाल असलेल्या गिरीश बापट (भाऊ) यांना पालकमंत्री आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होण्याची संधी एकाचवेळी मिळाली आहे. त्यामुळे नव्या कारभाऱ्यांपुढे पुणेकरांचे प्रलंबित प्रश्न सोडवून एकात्मिक विकास करण्याचे आव्हान आहे. जुन्या पुण्यात १९९० च्या दशकांपर्यंत खासदार विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्याचे कारभारी होते. मात्र, खासदार सुरेश कलमाडी यांनी १९९२ पासून काँग्रेसच्या माध्यमातून पुण्याच्या कारभारात सक्रीय झाले. १९९२ ते २००२ अशी १० वर्षे कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता होती. महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ कमी होवून राष्ट्रवादीच्या हाती पुणेकरांनी सत्ता दिली. तात्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या कारभारात फारशे लक्ष लक्ष घातले नाही. आता बापट यांना संधी मिळाली आहे.(प्रतिनिधी)
‘भाऊ’ आता पुण्याचे नवे कारभारी
By admin | Updated: April 3, 2015 03:24 IST