शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भातलागवड संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:01 IST

पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते.

ठळक मुद्देआंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ

तळेघर : गेले दहा ते बारा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने दडी मारल्यामुळे भातरोपांच्या लागवडी रखडल्या असून, आदिवासी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यातला परिसर भातशेतीचे आगार समजला जातो. येथील आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यांतून भात एकमेव पीक काढतो. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३,८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवांनी ह्या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या कात्र्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत तर काही ठिकाणी चिडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. वरुणराजाने पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. परंतु पुनर्वसू (कोर) थोरल्या नक्षत्रांच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला होता. भातरोपे चांगल्या प्रकारे तरारून लागवडीयोग्य होताच आदिवासी शेतकºयांनी भातरोपांच्या लागवडी सुरू केल्या. परंतु गेले दहा ते बारा दिवसांपासून या परिसरामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने भातलागवडी रखडल्या असून आदिवासी बांधव चिंंताग्रस्त झाला आहे. भातरोपे लागवडीसाठी लागणारा चिखल करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे  काही शेतकरी विहिरी बंधाऱ्यांतून इंजिनाद्वारे पाणी घेऊन भातलागवडी करत आहेत. परंतु लागवड केलेल्या भातरोपांचे काय, असे प्रश्न्नचिन्ह आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. परंतु गेले कित्येक वर्षांपासून या भागामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात आहे. वर्षानुवर्षे कष्ट करुन निसर्गाच्या या अवकृपेमुळे हे आदिवासी बांधवांचे कष्ट व्यर्थ जात आहेत.

टॅग्स :ambegaonआंबेगावFarmerशेतकरीRainपाऊस