शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भरून न येणा-या जखमतेून अजूनही सावरतंय माळीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:35 IST

एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता

- नीलेश काण्णव ।घोडेगाव : एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या सा-या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. त्याला उद्या ३० जुलैला बरोबर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेले असले तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही पूर्णत: मिटलेल्या नाहीत, हे माळीणवासींयांना भेटल्यावर जाणवत राहते. या दुर्घटनेला उद्या ३० जुलै २०१७ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत.३० जुलै २०१४ ची सकाळ, रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. डोंगरावरची झाडे भिंगरीसारखी उडत खाली आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदांत संपूर्ण गावच ढिगाºयाखाली गाडले गेले आणि या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. दुर्घटनेतून वाचलेले माळीण ग्रामस्थ नवीन बांधण्यात आलेल्या गावठाणात राहत असले तरी येथे पहिल्याच पावसात भराव खचून झालेले नुकसान पाहून हे पुन्हा भयभीत झाले होते. माळीण दुर्घटनेत ४० कुटुंबातील १५१ लोक ढिगाºयाखाली सापडून मृत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्टीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाºयाचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. तसेच दुर्घटना घडल्याबरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर तात्पुरती शेड उभारून येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले व कायमस्वरूपी पुनर्वसन एका वर्षात करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागली. नवीन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून सर्व बारा मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या १६ अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. मात्र यांनाही नवीन गावठाणात घर मिळाले. पहिल्याच पावसातनव्या गावाची दैनामात्र दि. २४ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात या नवीन गावाची दैना उडाली. ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेले, रस्ते खचले, रस्त्यांना तडे गेले, घरांच्या पायºया खचल्या, ड्रेनेजच्या पाइपलाइन उखडल्या, गटारे छोटी झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहिले, तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला धोका निर्माण झाला.सात कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या घरातपहिल्या पावसात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली, भिंतींना तडे गेल्याने या मोठमोठ्या बांधलेल्या आरसीसी भिंती घरांवर पडल्या, तर पुन्हा गावावर मोठे संकट येऊ शकते किंवा भराव खचू लागल्याने घरेही खचतील, या भीतीने काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची तयारी करू लागले. यातील सात कुटुंबे पत्र्याच्या शेडवर राहायलादेखील गेली आहेत.उर्वरित कामे पावसाळ््यानंतरचप्रशासनाने तत्काळ दखल घेत खचलेले भराव भरले, नवीन गटारे बांधली, रस्ते दुरुस्त करून घेतले, लाईटचे पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरू करून दिला, पाइपलाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र यातील अनेक कामे पावसाळा संपल्याशिवाय करता येणार नाहीत. यामध्ये पक्के रस्ते बांधणे, नवीन पायºया करणे, घरांपुढील खचलेल्या पायºया करणे ही कामे पावसाळा संपल्याबरोबर सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.नव्या माळीणपुढचे सवाल :सपाटीकरण करण्यासाठी खालची जमीन मोठ्या प्रमाणात खोदली गेली व नवीन सुमारे ८ ते १० मीटर उंचीचे भराव केले गेले. हे भराव खचू शकतात, ही बाब प्रकल्प सल्लागारांच्या लक्षात का आली नाही?थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्येनक्की काय झाले?मातीवरच पायºया बांधल्यानेत्या खचल्या. यात दोषी कोण?