शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

भाजपाने सर केला भोसरीतील राष्ट्रवादीचा गड

By admin | Updated: February 25, 2017 02:21 IST

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरी मतदारसंघात भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून भोसरीच ठरवणार शहराचे राजकीय भवितव्य अशी परिस्थिती निर्माण केली आहे

नितीन शिंदे, भोसरीआमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरी मतदारसंघात भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून भोसरीच ठरवणार शहराचे राजकीय भवितव्य अशी परिस्थिती निर्माण केली आहे. जागावाटपात शह-काटशहाचे राजकारण रंगले असताना भाजपाला अंतर्गत दुहीचा फटका बसणार असे बोलले जात होते. मात्र सर्वच अंदाज फोल ठरवत आमदार लांडगे व भाजपावर विश्वास ठेवल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वत:ची वेगळी छाप निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या लांडगे यांनी आपला करिष्मा महापालिकेच्या निवडणुकीत दाखवून दिला आहे. सुरुवातीला माजी आमदार विलास लांडे यांना शह देऊन राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे आमदार लांडगे यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच आव्हान देऊन पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक जागा भोसरीतून निवडून देणार असल्याचा शब्द व्हिजन २०-२० कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता शहरात पुन्हा येणार अशी चर्चा सुरू होती. माजी आमदार विलास लांडे यांना पक्षाने ताकत देऊन भोसरीतून सर्वाधिक जागा निवडून आणल्यास विलास लांडे यांचे पुनर्वसन होणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र स्वत:च्या मुलाचा निसटता विजय सोडला, तर विलास लांडे यांना काहीच करिष्मा करता आला नाही, असेच चित्र आहे. संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या भोसरी गावठाण जागेसाठी आजी-माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी आमदार लांडगे यांनी चारही जागा जिंकून लांडे यांना मोठा शह दिला.भोसरी मतदारसंघात मोशी, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी गावठाण व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गवळीनगर प्रभागातसुद्धा आमदार लांडगे यांनी आपला वेगळा करिष्मा दाखवून दिला आहे. गवळीनगरमध्ये आमदार लांडगे यांच्या भावाचा पराभव झाला असला, तरी या ठिकाणी झालेल्या लढतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे. इंद्रायणीनगरमध्ये माजी आमदार विलास लांडे यांना मुलाच्या निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. येथील एक जागा सोडली, तर तीनही जागा भाजपाने मताधिक्याने निवडून आणल्या आहेत. एकूणच भोसरीवर आजपर्यंत असलेला राष्ट्रवादीचा दबदबा या निवडणुकीत संपला अशीच चर्चा आहे. विलास लांडे यांचे प्रभाग आठमध्ये आपल्या मुलाच्या प्रचारात व्यस्त राहणे व सगळीकडे दुर्लक्ष करणे राष्ट्रवादीला महागात पडले, अशी चर्चा अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. राजकारणातील अभ्यासू, चाणाक्ष, चतुर ही उपमा कायम विलास लांडे यांना लावली जायची. मात्र या सर्वावर मत देऊन आमदार लांडगे यांनी शहरात आपले स्वत:चे असे नेटवर्क उभे करून शहरावर आपल्या नेतृत्वाने मात केली आहे. भाजपाच्या सर्वाधिक जागा जिंकून ‘हम भी किसी से कम नही’ हे दाखवून दिले आहे. या पराभवाने राष्ट्रवादीचे पानिपत झाले असून शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे भोसरीतील शिवसेनेचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे.