शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून फरारी आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 16:00 IST

जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न व इतर चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले.

ठळक मुद्देपोलिसांनी दोन पथके तयार करुन रचला सापळा, अचानक छापा घालून पकडलेमोटारसायकल व मोबाईल असा ३५ हजार रुपयांचा माल हस्तगत

पुणे : जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न व इतर चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले.अक्षय ऊर्फ आकाश किशोर चौधरी (वय२१, रा़ मंतरवाडी, उरुळी देवाची, ता़ हवेली) याला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे़ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना कात्रज चौकात आले असताना पोलीस कर्मचारी बाबा नरळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की कात्रज जुना बोगदा मस्तान हॉटेलजवळ मांगडेवाडी येथे दोघे जण मोटारसायकल घेऊन उभे असून त्यांच्याकडील मोटारसायकल संशयित आहे़ या माहितीवरुन पोलिसांनी दोन पथके तयार करुन तेथे सापळा रचला़ अचानक त्यांच्यावर छापा घालून पकडले़ त्यांच्याकडून मोटारसायकल व मोबाईल असा ३५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला़ अक्षय चौधरी याच्याकडील मोटारसायकल चोरीची असून त्याची शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, कृष्णा बढे, गणेश सुतार, समीर बागसिराज, बाबा नरके, योगेश सुळ, सुमित मोघे यांनी ही कामगिरी केली़ 

टॅग्स :Puneपुणे