शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

समाजहितासाठी झटणारी माणसे दीर्घायू व्हावीत : प्रतिभा पाटील : भाई वैैद्य यांना पुरस्कार प्रदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:57 IST

पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना साथी दत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ताजीराव पासलकर ग्रंथालय, अभ्यासिका व पानशेत वरसगाव धरणग्रस्त सेवा संघाच्या वतीने दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला.

ठळक मुद्देज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना साथी दत्ता पुरस्कार प्रदानसमाजकारण करायचे असेल तर ते खेड्यातून करावे : कुमार सप्तर्षी

पुणे : दत्ता पासलकर हे धरणग्रस्तांचे नेते होते. त्यांनी जनतेचे प्रश्न कायम उचलून धरले. या झुंजार नेत्याच्या नावाचा पुरस्कार भार्इंसारख्या झुंजार नेत्याला मिळणे, ही कौैतुकास्पद बाब आहे. राष्ट्रसेवा दलातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी तरुणांमध्ये पेटवलेली ज्योत अजूनही धगधगते आहे. समाजहितासाठी झटणारी माणसे दीर्घायू व्हावीत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना साथी दत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ताजीराव पासलकर ग्रंथालय, अभ्यासिका व पानशेत वरसगाव धरणग्रस्त सेवा संघाच्या वतीने दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमात पाटील बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते. अ‍ॅड. प्रताप परदेशी, अंकुश काकडे आदींच्या उपस्थितीत सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे कार्यक्रम पार पडला. संजय पासलकर यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद चव्हाण यांनी आभार मानले.

सप्तर्षी म्हणाले, ‘भाई वैैद्य हे समाजवादी विचारसरणीचे भीष्माचार्य आहेत. पुण्याच्या पातळीवर एस. एम. जोशी हे गांधीजींच्या तर भाई सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत होते. अण्णांच्या मागे संघटन करण्याचे कार्य भार्इंनी पार पाडले. समाजवादाचा धर्म सत्याग्रहाचा असतो. समाजकारण करायचे असेल तर ते खेड्यातून करावे.’भाई वैैद्य म्हणाले, ‘दत्ताजी पासलकर कमी बोलत आणि खूप काम करत. त्यांनी समाजवादी आंदोलनात अनेक वर्षे काम केले. कोणतीही अपेक्षा न करता समाजवादाने प्रेरित होऊन काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोलाचा असून, भविष्यात काम करण्याची उमेद देत राहील.’

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलPuneपुणे