शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उन असह्य हाेतंय, तर मग पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:45 IST

उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाला असाल, अाणि कुठेतरी थंड ठिकाणी जायची इच्छा असेल. तर पुण्याजवळील हि सात ठिकाणे तुमची इच्छा जरुर पुर्ण करतील.

पुणे : राज्यातील शहरांच तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं अाहे. पुण्याचा पाराही तब्बल 40 अंशापर्यंत गेला हाेता. त्यामुळे उन्हाच्या या कडाक्याला कंटाळला असाल, अाणि थंड ठिकाणी जाण्याची इच्छा असेल, तर पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या. 

महाबळेश्वर महाराष्ट्रातील काश्मीर अशी महाबळेश्वरची अाेळख अाहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ख्याती सगळीकडे अाहे. साेबतच निसर्गाचा अद्भूत नजराणा येथे पाहायला मिळताे. येथील सनसेट व सनराईज पाईंट पर्यटकांच्या विशेष पसंतीचा अाहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं महाबळेश्वर पर्यटकांना नेहमीच खुणावत असतं. येथील स्ट्राॅबेरी विशेष फेमस अाहे. पुण्यापासून 120 किलाेमीटर अंतरावर असलेल्या महाबळेश्वरला तुम्ही अद्याप गेला नसाल तर या उन्हाळ्यात जरुर भेट द्या. 

पाचगणीमहाबळेश्वरच्या वाटेतच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण लागते. येथील उत्तम हवामानासाठी पाचगणी अाेळखले जाते. पुण्यापासून अवघ्या शंभर किलाेमीटरवर पाचगणी अाहे. तुम्ही महाबळेश्वरचा प्लॅन करत असाल, तर पाचगणीला रस्त्यात थांबू शकता. टेबल लॅंड, सिडनी पाॅईंट येथील काही फेमस पाईंट अाहेत. 

माथेराननिसर्गाच्या जवळ जाण्याचा सर्वाेत्तम मार्ग म्हणजे माथेरान, भारतातील पहिले वाहतुकीपासून मुक्त हिल स्टेशन म्हणून माथेरान अाेळखले जाते. येथे अाल्यानंतर तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत हरवून जाता. टाॅय ट्रेनचा प्रवास पर्यटकांसाठी अानंददायी असताे. पुण्याहून 125 किलाेमीटर अंतरावर हे ठिकाण अाहे. 

लाेणावळा- खंडाळापुणेकरांच अाणि मुंबईकरांच अावडतं डेस्टिनेशन म्हणजे लाेणावळा-खंडाळा. तरुणांना लाेणावळा नेहमीच खूनावत असतं. जवळच कार्ला अाणि भाज्या लेणी असल्याने फॅमिली ट्रिपसाठी सुद्धा उत्तम असं हे ठिकाण अाहे. पुण्यापासून अवघ्या 2 तासांवर लाेणावळा अाहे. ट्रेकर, बाईकर तरुणांच्या अावडीचं असं हे ठिकाण अाहे. 

मुळशीवन डे पिकनिकसाठी मुळशी हा चांगला पर्याय अाहे. दूरवर पसरलेलं निसर्गसाैंदर्य अाणि मुळशी धरण तुम्हाला नक्कीच अावडेल. पुण्यातून अवघ्या एक ते दीड तासात तुम्ही येथे पाेहचू शकता. येथील वातावरण बाराही महिने अल्हाददायक असते. 

पानशेततुम्हाला बाेटींगचा अानंद घ्यायचा असेल तर पानशेतचा अाॅप्शन तुमच्याकडे अाहे. तुम्ही या ठिकाणी मनसाेक्त बाेटिंग करु शकता. त्याचबराेबर पिठलं भाकरीचा अास्वादही तुम्ही या ठिकाणी चाखू शकता. कुटुंबासाेबतच्या एक दिवसाच्या ट्रिपसाठी पानशेत हा चांगला अाॅप्शन अाहे. पुण्यापासून 50 किलाेमीटर अंतरावर हे धरण अाहे. 

खडकवासलाअगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खडकवासल्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. खडकवासला धरणाच्या किनारी संध्याकाळी असणारं अल्हाददायक वातावरण मन प्रसन्न करतं. येथील कांदाभजी सुद्धा पर्यटकांमध्ये अावडीची अाहेत. विकेंडला येथे माेठी गर्दी असते. पुण्यापासून फार लांब जायचे नसेल तर खडकवासला उत्तम पर्याय अाहे. 

टॅग्स :Travelप्रवासPuneपुणेMatheranमाथेरानlonavalaलोणावळा