शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध, मागासवर्गीय असल्याने आमदारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:43 IST

शहरातील विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.

पिंपरी : शहरातील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांना बोलू दिले नाही. पिंपरी या मागासवर्गीय मतदार संघाच्या आमदारांना बोलू न देणे हा त्यांचावरील अन्याय असून, आम्ही शिवसेनेतर्फे घटनेचा निषेध करतो, अशी माहिती श्रीरंग बारणे यांनी दिली.

शहरातील विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना कार्यक्रमात बोलण्याची संधी देण्यात आली. परंतु, शिवसेनेचे पिंपरी मतदारसंघाचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दोन मिनिटे बोलू देण्याची विनवणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, त्यांना बोलण्यापासून रोखण्यात आले. या घटनेचे छायाचित्र व बातमी केवळ दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली.पिंपरी मतदार संघातील विविध संस्था व संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. तसेच, खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या घटनेचा निषेध करीत मुख्यमंत्र्यांनी अन्याय केल्याची भावना गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी व्यक्त केली. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून त्यांच्या पदाधिका-यांकडून प्रोटोकॉल पाळला जात नाही. त्यामुळे मी महापालिकेच्या एकाही कार्यक्रमाला जात नाही, असे बारणे यांनी स्पष्ट केले.आयुक्तालयाचे श्रेय शिवसेनेचेपोलीस आयुक्तालयाचे पूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. या विषयांवर अनेकदा लक्षवेधी व तारांकित प्रश्न उपस्थित करून आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावला आहे. परंतु, उशिरा काही पक्षाचे लोक जागे झाले. मात्र, आयुक्तलायचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत, अशी टीका चाबुकस्वार यांनी थेट नाव न घेता शहरातील भाजपाच्या आमदारांवर केली.माझ्या मतदारसंघात मोठा मतदार झोपडीवासीय आहे. त्यांचे पुनर्वसन व प्राधिकरणबाधितांना १२.५ टक्के परतावा हे महत्त्वाचे प्रश्न मला मांडायचे होते. मुख्यमंत्र्यांना मी काय बोलणार हे माहिती होते; कारण आठ महिन्यांपासून त्यांच्या टेबलवर ही फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी मला नकार देऊन त्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे.- गौतम चाबुकस्वार, आमदार, पिंपरी

टॅग्स :Puneपुणे