शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानमधून रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:46 IST

५५० क्युसेकने विसर्ग सुरू; पिकांना होणार फायदा

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणात ४५.९७ टक्के म्हणजेच केवळ ४.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून शुक्रवारी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सकाळी ६ वाजल्यापासून ५५० क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तब्बल ५७ दिवसांनंतर म्हणजेच २८ डिसेंबरला शुक्रवारी दुपारी ३ वाजता बंद करण्यात आले होते. तेव्हा चासकमान धरणामध्ये ४४.१२ टक्के म्हणजे ४.३० टीएमसी व उपयुक्त साठा व ३.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मागील वर्षी याच तारखेला ७.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलैला सोडण्यात आाले होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकºयांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणीनुसार ते सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरीप हंगामाच्या पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच १२ आॅक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात आले होते. परंतु शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार पुन्हा २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु धरणाअंतर्गत पाणीटंचाई निर्माण होऊन भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असल्याने २८ डिसेंबरला शुक्रवारी सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले होते.धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लकचासकमान धरणामधून रब्बी हंगामाचे तिसरे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे रब्बी आवर्तनाचा शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्या शेतात मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, मिरची, बाजरी, ज्वारी आदींसह तरकारी पिकांना फायदा होऊन पिकांचे उत्पादन वाढून मोठ्या प्रमाणात पिकांना फायदा होणार आहे. सध्या धरणामध्ये ४५.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.पाणीपातळी ६४१.६८ मीटर आहे. एकूण साठा १२५.९१ दलघमी व उपयुक्त साठा ९८.६२ दलघमी आहे. रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते तेव्हा चासकमान धरणामध्ये ८४.१४ पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणीपातळी ६४७.५८ मीटर एकूण साठा २०७.७३ दलघमी, उपयुक्त साठा १८०.५४ दलघमी इतका होता.

टॅग्स :Waterपाणी