शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
4
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
5
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
6
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
7
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
8
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
9
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
10
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
11
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
12
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
13
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
14
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
15
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
16
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
17
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
18
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
19
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार

बीआरटी मार्गावर कारवाईला सुरुवात, घुसखोर वाहनांवर पीएमपीने उगारला बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 5:27 AM

संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात नियम मोडून घुसखोरी करणाºया दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर पीएमपी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे; तसेच या चालकांना रोखण्यासाठी बीआरटी प्रवेशद्वारावर गेट बसविण्याचा पीएमपीकडून विचार केला जात आहे.

पुणे : संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात नियम मोडून घुसखोरी करणा-या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर पीएमपी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे; तसेच या चालकांना रोखण्यासाठी बीआरटी प्रवेशद्वारावर गेट बसविण्याचा पीएमपीकडून विचार केला जात आहे. परिणामी, बीआरटी मार्गातील अपघातांना आळा बसणार आहे.शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक जलद व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या बीआरटी मार्गात इतर वाहने जात असल्याने अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचे निदर्शनास येत होते.त्यावर ‘लोकमत’ ने ‘अपघाताबाबत टोलवाटोलवी’ या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यानंतर पीएमपी प्रशासनाला जाग आली आणि बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-यांवर कारवाईला सुरुवात झाली.- बीआरटी मार्गातून जाणाºयांना रोखण्यासाठी दोरी लावण्यात आली. परिणामी, बीआरटी मार्गातून घुसखोरी करणाºयांवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. त्यातच काही वाहतूक पोलीस कर्मचाºयांनी सुद्धा बीआरटी मार्गात थांबून नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई केली आहे.- बीआरटी मार्गातून पीएमपी बसव्यतिरिक्त इतर वाहनांनी जाणे बेकायदेशीर आहे. पीएमपीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली. परंतु, सुरक्षारक्षकांशी वाद घालून; काही वेळा हाणामारीवर उतरून चारचाकी चालक व दुचाकीस्वार संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात घुसत आहेत.अधिकारी झाले सतर्क1बीआरटी मार्गातून केवळ बस जाणे अपेक्षित आहे; मात्र बीआरटीतून दुचाकी व चारचाकी वाहने सर्रासपणे जात असल्याने अपघात होत होते; तसेच पीएमपीच्या सुरक्षारक्षकांना स्थानिकांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते; परंतु बीआरटी मार्गातील अपघात रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आता कंबर कसली आहे.2संगमवाडी ते सादलबाबा चौक, तसेच डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी या दरम्यान बीआरटी मार्ग सुरू होतो त्या ठिकाणी दोरी लावण्यात आली आहे. दोरीला लाल रंगाचे कापड बांधले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना बीआरटी मार्गात येत नाहीत. केवळ बस आल्यानंतरच सुरक्षा रक्षक दोरी खाली घेतात, असे चित्र शनिवारी दिसून आले.अहमदनगर रस्त्यासह बीआरटीच्या पाच मार्गांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. बीआरटीतून घुसणाºया वाहनांचे क्रमांक संबंधित वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनला दिल्यानंतर, नियम मोडणाºयांवर कारवाई केली जाते. काही वाहनचालकांना बीआरटीतून जाण्यास रोखल्यास त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार घडले. त्यात चार सुरक्षारक्षक जखमी झाले होते. त्यातच बीआरटी मार्गात अपघात होत असल्याने बीआरटीच्या मार्गाच्या सुरुवातीस गेट बसविण्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्गावर दोरी बांधून दुचाकी व चारचाकी वाहनांना रोखले जात आहे.- अविनाश डोंगरे, प्रभारी सुरक्षा अधिकारी, पीएमपी

टॅग्स :Puneपुणे