पुण्याच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने पालेभाज्यांजे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 02:13 PM2019-01-02T14:13:16+5:302019-01-02T14:14:03+5:30

भाजीपाला :मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने बहुतेक भाज्यांचे दर स्थिर होते. 

Because of the rise in arrivals of vegetables in the Pune market, the prices are stable | पुण्याच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने पालेभाज्यांजे भाव स्थिर

पुण्याच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने पालेभाज्यांजे भाव स्थिर

Next

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी फळभाज्या व पालेभाज्यांची चांगली आवक झाली. मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने बहुतेक भाज्यांचे दर स्थिर होते. 

कांद्याला क्विंटलला ८०० ते १,१०० रुपये एवढा दर मिळाला, तर गवारला क्विंटलला तीन ते सहा हजार रुपये एवढा दर मिळाला. टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असून, टोमॅटोला क्विंटलला ८०० ते २००० रुपये एवढा भाव मिळाला, तर भेंडीला क्विंटलला १,५०० ते ५,००० रुपये दर मिळाला. वांग्याला एक हजार ते तीन हजार रुपये दर मिळाला. पालेभाज्यांची आवक चांगली होत असून, यामुळे कोथिंबिरीला शेकडा गड्डी ७०० ते २,००० रुपये दर मिळाला, मेथीची आवक जास्त झाल्याने मेथीला ४०० ते ७०० रुपये शेकडा गड्डी एवढा दर मिळाला. मेथीची १४ हजार ५९६ गड्डी एवढी आवक झाली, तर कोथिंबिरीची ७३ हजार गड्डी एवढी आवक झाली, असे कृषी उत्पन्न बाजार समितीने  स्पष्ट केले.

Web Title: Because of the rise in arrivals of vegetables in the Pune market, the prices are stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.