शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस फुलांचे 'सौंदर्य' पर्यावरणासाठी ठरतेय घातक; स्थानिक गवतांचे होतेय 'मरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:47 IST

सौंदर्याला भुलू नये, समूळ नष्ट करावे

श्रीकिशन काळे-पुणे : तळजाई टेकडीवर आणि शहरात अनेक ठिकाणी पिवळ्या फुलांना बहर आला आहे, त्याचे सौंदर्य पाहून नागरिक त्यासोबत फोटो देखील काढत आहेत. पण ते 'सौंदर्य' पर्यावरणासाठी घातक असून, त्याला 'कॉसमॉस' असे नाव आहे. ते परदेशी तण असून, स्थानिक गवत त्यामुळे नष्ट होत आहे. जे आपल्या गुरांचे खाद्य आहे. या 'कॉसमॉस'मुळे ते खाद्य कमी होत आहे.  

परदेशी तण 'कॉसमॉस' यावर प्राणी, पक्ष्यांना उपजिविका करता येत नाही. हे तण गुरांना आवश्यक असणारे स्थानिक गवत नष्ट करून वाढत आहे. केवळ फुले चांगली दिसतात. लोकांना त्याचा उपयोग किंवा इतर माहिती नाही. सध्या शेताच्या बांधावर देखील ते येत आहे. परिणामी जैवसाखळी नष्ट होत आहे. मेंढरे, गाय, बैल, शेळ्या यांसाठी जे गवत लागते, ते कमी होत असल्याने त्यांना इतरत्र फिरावे लागत आहे. ह्यकॉसमॉसह्ण बाबत शेतकरी, नागरिक यांच्यात जनजागृती करायला हवी. हे तण काढून टाकण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली. सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे, तशी तण काढण्याची सुरू व्हावी. समुळ उच्चाटन करण्यासाठी गावांमधील जैवविविधता समित्यांना, नागरिकांना याबाबत सांगायला हवे. लोकसहभाग घेतला तरच हे आगंतुक तण नष्ट होईल.  

मधमाशांच्या मधावर व्हावे संशोधनपूर्वी या कॉसमॉस फुलांवर किटक बसत नव्हते. पण इतर काहीच पर्याय नसल्याने इप्सिफोरिया ही मधमाशांची स्थानिक जात त्यावर आता बसू लागली आहे. त्यातील परागकण घेऊन ते मध तयार करीत आहेत. तो मध खाल्ला तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, त्याबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. एकूणच हे कॉसमॉस तण नुकसानकारक आहे.   

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण