याप्रकरणी भाऊसाहेब मुरलीधर खेनट (वय ३८, रा. पिंपळे, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रकाश भिवा खेडेकर (रा. शिंदवणे,ता हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब खेनट यांची मोठी बहीण उज्वला खेडेकर ही व तिचे पती प्रकाश यांची सतत भांडणे होत असल्याने गेले तीन महीने ती दोन मुली व एका मुलासह भावाकडे राहण्यास होती. दहा बारा दिवसांपुर्वी भाऊ बहीण व तीचे मुलांना घेऊन शिंदवणे येथे तीचे सासरी आले. तीचे पती यांना भांडणतंडा करू नका असे सांगुन तीला तीचे पतीकडे सोडुन गेले होते.
सोमवारी (दि १५) सांयकाळी ७.३० च्या सुमारास बहिण उज्वला हीला भेटण्यासाठी भाऊसाहेब हे आपल्या दोन मुलांसह आले होते. त्यावेळी दोन्ही मुले बहिणेचे घरामध्ये गेली. भाऊसाहेब दरामध्ये बाहेरच उभे होते. त्यावेळी दाजी प्रकाश यांनी त्यांना पाहीले व तु आमचे घरामध्ये यायचे नाही. असे म्हणुन शिवीगाळ करून घरामध्ये गेले व लोखंडी तलवार घेऊन भाऊसाहेब यांना मारहाण केली. या घटनेत भाऊसाहेब यांच्या डाव्या हाताचे तीन बोटांना व उजव्या अंगठयास गंभीर दुखापत झाली.