शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

घरातून अपहरण करून लाटले पावणेदोन लाख, चौघांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:10 IST

मेदनकरवाडी (ता. खेड) येथून राहत्या घरातून एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी केला पोबारातीन अनोळखी इसमांसह पांडुरंग औटी असा चौघांवर गुन्हा दाखल

चाकण : मेदनकरवाडी (ता. खेड) येथून राहत्या घरातून एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नानासाहेब खराडे (वय ४२, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण, मुळगाव कारखेल, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी इसमांसह पांडुरंग औटी (रा. येलवाडी, ता. खेड) असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास खराडे हे घरात झोपलेले असताना चौघांनी दार वाजवून त्यांना उठविले व खराडे यांना मोटारीतून एमआयडीसी भागात पळवून नेवून बेदम मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी पैशांची मागणी केली असता त्यास नकार दिला असता एकाने डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर खराडे यांनी पैसे देण्याचे कबूल केल्याने विविध भागातील एटीएममधून त्यांच्या खात्यातून वीस हजाराची रक्कम काढून घेतली. त्यानंतर शनिवारी स्टेट बँकेच्या चाकण येथील शाखेतून विड्रॉल स्लिप भरून ५० हजाराची रक्कम काढण्यासाठी खराडे यांना पाठवून दोन अपहरणकर्ते कोहिनूर सेंटरच्या शाखेच्या बाहेर थांबले व दोघेजण मोटारीत बसून राहिले. बँकेत प्रवेश करताच अपहृत खराडे हे थेट अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन संरक्षित झाले. ते जखमी झाल्याने त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यामुळे सगळे कर्मचारी गोंधळून गेले. परंतु आपले पैशासाठी अपहरण झाल्याचे सांगितल्यानंतर बँकेतील वातावरण शांत झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चाकण पोलिसांना कळविले त्यामुळे अपहरणकर्ते मोटारीतून पळून गेले. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे