शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या भांडणातून शिक्रापुरात मारहाण; तिघांनी केला एका कामगाराचा खून, दोघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 16:13 IST

दारू पिण्याच्या कारणाहून एका कामगाराचा तिघांनी खून केल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडला आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देघनशाम विद्यानाथ पटेल (वय ४०) असे खून झालेल्या कामगाराचे नावगुन्ह्यातील नागेंद्र राजभर व राजेंद्र राजभर हे दोघे सख्खे भाऊ फरार

शिक्रापूर : दारू पिण्याच्या कारणाहून एका कामगाराचा तिघांनी खून केल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडला आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.घनश्याम विद्यानाथ पटेल (वय ४०, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. उरदहा ता. कुशीनगर, जि. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे एका इमारतीमध्ये काम करणारे नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख व घनश्याम पटेल हे चार कामगार राहत असून त्यांचामध्ये दारू पिण्यावरून किरकोळ भांडणे होत होती. बुधवारी देखील या चौघांमध्ये भांडण झाले. यावेळी दारू पिताना झालेल्या भांडणात रवींद्र याने तिघांना देखील तोंडात मारले. त्यावेळी घनशाम याने देखील रवींद्र याला मारले असताना रवींद्र, नागेंद्र व निजाम या तिघांनी मिळून घनश्याम पटेल याला मारहाण केली. त्यावेळी रवींद्र याने घनश्याम याला डोके धरून शेजारील भिंतीवर आदळले. त्यावेळी डोक्याला जबर मार लागल्याने घनशाम हा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख हे तिघे देखील पळून गेले. त्यांनतर कामगारांचे सुपरवायझर असलेले राजेंद्र शेळके हे त्या ठिकाणी आले असता त्यांना घनशाम हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्यावेळी त्यांनी शेजारी पहिले असता त्यांना दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. शेळके यांनी घनशाम जवळ जाऊन पहिले असता घनश्याम मृत्युमुखी पडलेला असल्याचे त्यांना दिसून आल. त्याचवेळी शेळके यांचा कामगार रवींद्र यांना फोन आला. तुम्ही कोठे आहे असे विचारले असता आमचे व पटेलचे भांडण झाले असून आम्ही त्याला मारहाण केली आहे असे म्हणून रवींद्र याने फोन कट केला. त्यामुळे त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना एकजण चाकण येथे गेला असल्याचे समजले. माणिक चौक चाकण येथून निजाम उर्फ नजमुद्दीन शेख याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील नागेंद्र राजभर व राजेंद्र राजभर हे दोघे सख्खे भाऊ फरार आहेत.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरChakanचाकणPuneपुणे