शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: 'चांगला राहत जा', सांगणार्‍या वडिलाचा मुलाने केला खून, पुण्यातील घटना

By विवेक भुसे | Updated: September 19, 2023 11:09 IST

झोपलेल्या वडिलांवर केला हल्ला

पुणे : काम धंदा करत जा, चांगला राहत जा असे सांगणार्‍या वडिलांच्या छातीत कात्रीने मारुन त्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. झोपत असलेल्या वडिलांवर हल्ला करुन त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.लक्ष्मण मंजुळे (वय ५५, रा. टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) याला अटक केली आहे. ही घटना टिंगरेनगरमध्ये सोमवारी पहाटे दीड वाजता घडली.

याबाबत लक्ष्मण यांचे मेव्हणे बाबु रामु दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंजुळे हे सध्या आजारी असतात. शिवनाथ मंजुळे हा अकरावीपर्यंत शिकला असून सध्या काही कामधंदा करत नाही. ते शिवनाथ याला नेहमी काही तरी कामधंदा करत जा. अंघोळ करत जा, चांगला राहत जा, असे बोलत असत. त्यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत असत.

मंजुळे यांची विवाहित मुलगी सध्या त्यांच्याकडे बाळंतपणासाठी आली आहे. सोमवारी रात्री सर्व जण झोपले असताना शिवनाथ याने घरातील कात्री घेऊन झोपलेल्या वडिलांच्या छातीत व पोटात खुपसली. त्यांच्या ओरडण्याने त्याच्या आईला जाग आली. तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, त्यात कात्री हाताला लागून त्याही जखमी झाल्या आहेत. लक्ष्मण मंजुळे यांना रुग्णालयात नेले़ परंतु, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी शिवनाथ याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड