शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘तोरणा’वर जाताय सावधान ! धोकादायक ठिकाणी जाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:57 IST

तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील अतिदुर्गम तोरणा किल्ल्यावर तळ्यात बुडून एका युवकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘लोकमत’ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या पाहणीत अनेक धोकादायक ठिकाणे असल्याचे समोर आले आहे.

हरिप्रसाद सवणेवेल्हे : तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील अतिदुर्गम तोरणा किल्ल्यावर तळ्यात बुडून एका युवकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘लोकमत’ने किल्ल्यावर जाऊन केलेल्या पाहणीत अनेक धोकादायक ठिकाणे असल्याचे समोर आले आहे. येथे सूचनाफलकही लावण्याचे कष्ट पुरातत्त्व विभागाने घेतले नाही. त्यामुळे पर्यटकांनो, किल्ल्यावर जाताय सावधान!पावसाळ्यात वर्षासहली आणि भिजण्याचा आनंद घेण्यासाठी किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच, ट्रेकर्स ग्रुपही येथे येत आहेत. मात्र, येथील पर्यटकांवर नियंत्रण ठेवणारी सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अवघड ठिकाणी धोक्याच्या सूचना, संवेदनशील ठिकाणी जाण्यास निर्बंध आणि गडसुरक्षा यांचा अभाव असल्याने तोरणा किल्ला मृत्यूचा सापळा बनत आहे.शिवाय, तोरणा किल्ल्याचे बांधकामही अतिशय जुनाट व धोकादायक बनले आहे. किल्ल्यावरील अनेक धोकादायक ठिकाणे सूचनांअभावी व माहितीअभावी पर्यटकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. अशा अनोळखी ठिकाणी खबरदारीचे सूचनाफलक व सुरक्षा यंत्रणा नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. किल्ल्यावरील अशा धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावावेत आणि किल्ल्यावरील व चढाई मार्गावरील जीवघेण्या ठिकाणी पुरातत्त्व विभागाने लक्ष घालून संरक्षणात्मक रचना उभी करावी, अशी मागणी वेल्हे येथील मावळा जवान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.असा आहे तोरणागड..तोरणा किल्ल्याला शिवकालीन इतिहासापूर्वी प्रचंडगड असे नाव होते. या किल्ल्याची व्याप्ती अतिप्रचंड आहे. सह्याद्रीच्या अत्युच्य किल्ल्यात सर्वांत उंच किल्ला म्हणून तोरणागडाची गणना होते. किल्ल्याभोवती घनदाट अरण्य असून, आजही अनेक ठिकाणी मनुष्यास जाणे शक्य नाही. उंच आणि ताशीव कडे, धोकादायक वाटा यामुळे गडवाट अतिशय कठीण आहे. परिसरात जंगली श्वापदांचा वावर आणि गडाच्या बाजूने सर्वत्र उंच डोंगररांगा पसरल्याने हा परिसर म्हणजे डेंजर झोन आहे. या परिसरात डोंगरांमुळे व जंगलामुळेएकदा रस्ता चुकला, की परत सापडणे कठीण आहे.यंत्रणेअभावी मृत्यूला निमंत्रण...११ व्या शतकात बहामनी राजवटीत बांधलेले बुरुज ढासळत आहेत. अशा ठिकाणी सूचनाफलक लावणे किंवा तेथे जाण्यास निर्बंध घालणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी पर्यटक राजरोसपणे जाऊन बसत आहेत. शिवाय, येथे ४ ते ५ तलाव असून पावसाळ्यात हे तलाव काठोकाठ भरतात. नवीन पर्यटक उत्साहात पाण्यात उतरतात येथेही धोक्याच्या सूचना दिल्यास अनर्थ टळू शकतो. गडावर अनेक धोकादायक वाटा असून, पर्यटकांना योग्य रस्ते सापडत नाहीत. परिणामी चुकीच्या दिशेने भरकटून जाऊन कड्यावरून कोसळून जीव जाण्याच्या घटना येथे घडत आहेत.तर त्याचा जीव वाचला असता......गणेशस्थापनेदिवशी किल्ल्यावर आलेल्या एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्या तरुणाला गडावरील तलावात पाणी कमी आहे, असे वाटल्याने तो तलावात उतरला. मात्र, पाय घसरून तो सरळ आत बुडाला. धुक्यामुळे व पावसामुळे त्याच्या मित्रांना तो बुडाल्याचे समजलेच नाही. वास्तविक या तलावाच्या ठिकाणी धोक्याची सूचना असती, तर खबरदारी घेऊन त्याचे प्राण वाचले असते. मात्र, अशा धोक्याच्या सूचना नसल्याने माहिती नसलेले नवखे पर्यटक धोका पत्करून जिवाशी खेळ खेळतात.गडावरील काही दुर्घटनाउत्तर प्रदेश येथील दोन युवकांचा तोरणा किल्ल्यावरील कड्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला होता. मृतदेह शोधण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते. ५ दिवसांनी मृतदेह सापडले.१९ फेब्रुवारी २०१६ : सातारा येथील युवकाचा किल्ल्यावर चढताना दरीत कोसळून मृत्यूजून २०१७ : पुण्यातील तरुण कापसे हा युवक पाय घसरून कड्यावरून कोसळला; गंभीर जखमी.२५ आॅगस्ट २०१७ : पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमधील यशवंत गोल्लापुडी याचा गडावरील तलावात बुडून मृत्यू.