शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

मांजरी निवडणुकीत बोगस मतदान? राष्ट्रवादीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:42 AM

मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्रे सापडली असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असताना, पोलिसांनी कारवाई टाळली असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस ओळखपत्र व त्यामागील सूत्रधारास अटक करावी...

हडपसर - मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ओळखपत्रे सापडली असून, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असताना, पोलिसांनी कारवाई टाळली असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस ओळखपत्र व त्यामागील सूत्रधारास अटक करावी; अन्यथा पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुरेश घुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांची भेट देऊन निवेदन दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, विशाल घुले, शिवाजी खलसे, प्रशांत घुले, दिलीप टकले आदी या वेळी उपस्थित होते. नुकतीच मांजरी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, या निवडणुकीत वॉर्ड क्र.३ मध्ये ३०० बोगस मतदान ओळखपत्र व बाहेरून मतदानासाठी आलेले कार्यकर्ते सापडले. बोगस ओळखपत्र व कार्यकर्ते हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, आमदार योगेश टिळेकरांच्या दबावामुळे पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही, बोगस मतदान ही लोकशाहीला मारक असून प्रामाणिक कार्य करणाºया कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मांजरी निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली नाही, पोलीस, प्रशासन हाताशी धरून आमदारांनी अशाच पद्धतीने पूर्ण ग्रामपंचायत वॉर्डात बोगस मतदान केल्याचा संशय सुरेश घुले यांनी व्यक्त केला आहे. बोगस निवडणूक ओळखपत्रांबाबत निवडणूक आयोग व संबंधित कार्यालयाकडे आम्ही रिपोर्ट पाठविणार आहोत, असे मिलिंद पाटील यांनी सांगितले. विशाल ढोरे यांच्या तक्रारीत तपास करून कारवाई करणार असल्याचे विष्णू पवार यांनी सांगितले.कोंढव्याप्रमाणे मांजरीत आमदाराचा डावमनपा निवडणुकीत आमदार योगेश टिळेकर यांनी आईच्या प्रभागात बाहेरून लोक आणून बोगस मतदान केले होते, तेव्हा गाड्या पकडल्या होत्या. मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीतही बाहेरून बोगस मतदार आणले, बोगस मतदार ओळखपत्र सापडले आहेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आमदाराने केले आहे, जनता २०१९ निवडणुकीत परतफेड करेल.- सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसहल्लेखोरांवरकारवाई करावीनिवडणुकीच्या आदल्या दिवशी माझ्या घरावर व कुटुंबावर हत्यारे घेऊन हल्ला केला, गाड्या फोडल्या, दगडफेक केली. पोलिसांनी अद्याप या गुंडांवर कारवाई केली नाही, हल्ला करणारे हल्लेखोर प्रमोद कोद्रे, प्रदीप कोद्रे, सराईत गुन्हेगार संतोष जायभाय, बबन जगताप व मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू.- विशाल ढोरे, मनसे

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे