शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील न्यायालयाच्या ‘न्यायमंदिर’ शब्दावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:38 IST

बारामती : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीवरील ‘न्यायमंदिर’ या शब्दावर येथील सी. आर. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्या ठिकाणी न्यायालय असा उल्लेख करावा, यासाठी अ‍ॅड. मोरे यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.दि. २८ आॅगस्ट रोजी अ‍ॅड. मोरे यांनी ही जनहित याचिका ...

बारामती : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीवरील ‘न्यायमंदिर’ या शब्दावर येथील सी. आर. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्या ठिकाणी न्यायालय असा उल्लेख करावा, यासाठी अ‍ॅड. मोरे यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

दि. २८ आॅगस्ट रोजी अ‍ॅड. मोरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यात अ‍ॅड. मोरे यांनी असे नमूद केले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार, भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानता दिली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ नुसार भारतीय नागरिक तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला कायद्यासमोर समानता आहे.‘मंदिर’ हे हिंदू धर्मामध्ये पूजाअर्चा व देवदेवतांची उपासना करण्याचे पवित्र असे धार्मिक ठिकाण मानले जाते. अनेक शब्दकोषानुसार ‘मंदिर’ या शब्दाचा काय अर्थ होतो, हेदेखील स्पष्टपणे याचिकेत नमूद केले आहे.

‘मंदिर’ या शब्दाचा भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेल्या न्याय संस्थेचा कशाप्रकारे काही एक संबंध नाही, हेदेखील या याचिकेत नमूद केले आहे. महाराष्ट्रात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात, ते न्यायासाठी न्यायालयात जातात. त्या वेळी ते न्यायालयाच्या इमारतीवर न्यायमंदिर या शब्दांचा उल्लेख पाहतात. यावरून त्यांच्या मनामध्ये न्याय संस्थेविषयी वेगळी भावना निर्माण होऊ शकते. न्यायसंस्था ही ठरावीक धर्मासाठी व ठरावीक धर्माच्या लोकांसाठी निर्माण केलेली नाही. त्यामुळे ‘न्यायमंदिर’ या शब्दाचा प्रयोग करणे बेकायदेशीर असल्याचे याचिकेत म्हटले आहे.न्याय संस्थेच्या इमारतीवर ‘न्यायालय’ या शब्दाऐवजी ‘न्यायमंदिर’ शब्दाचा वापर करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा, प्रस्तावनेचा, कलम १४ चा अवमान आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. जनहित याचिका दाखल करत असताना अ‍ॅड. मोरे यांनी बारामती, दौंड, इंदापूर, जळगाव, गोंदिया येथील न्यायालय इमारतींवर न्यायमंदिर शब्दाचा वापर केले असल्याची छायाचित्रेदेखील दाखल केली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम २२६ नुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती