डिझायर स्पोर्ट्स ग्राउंड वर झालेल्या टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अंतिम सामना बारामती सुपर किंग्स व भिगवन मेडिकल असोसिएशन या संघामध्ये अटीतटीचा झाला. प्रथम फलंदाजी करताना बारामती सुपर किंग्स संघाने डॉ.मिलिंद गाढवे यांच्या पहिल्याच षटकात तीन विकेट गमावल्या पण डॉ. विनायक आटोळे यांच्या संयमी फलंदाजीने बारामती संघाने १० ओव्हरमध्ये ६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना भिगवण संघाची संथ फलंदाजी व बारामती संघाचे चपळ क्षेत्ररक्षण,अप्रतिम झेल व उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भिगवनच्या प्रमुख फलंदाजांना ठारावीक अंतराने बाद केल्याने शेवटच्या षटकात १२ धावांची गरज भिगवण संघ पूर्ण करू शकले नाहीत व बारामतीने करंडकावर दिमाखात नाव कोरले. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजी मुळे मॅन ऑफ द मॅच डॉ. प्रशांत हगारे ठरले. स्पर्धेचे अष्टपैलू खेळाडू डॉ. सागर वाबळे, स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज डॉ. तेजस खटके, स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज डॉ. मिलिंद गाढवे ठरले, या सर्वांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत लोणी काळभोर, उरुळी कांचन, दौंड, टेंभुर्णी, बीड, अकलूज, फलटण, मंचर, शिरूर, अहमदनगर, अकोले, वाघोली, मांजरी, माळवाडी-साडेसतरा नळी इत्यादी येथील २० डॉक्टर्स असोसिएशनच्या संघांनी सहभाग नोंदविला.
बक्षीस समारंभास विश्वराज हॉस्पिटल चे मेडीकल डायरेक्टर डॉ. राकेश शहा व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश नरमेठी, शिवम मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. टी. आर जाधव. पी. एच. डायग्नॉस्टिकचे डॉ. मनीष चढ्ढा, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. लहाने, अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर, डॉ. रतन काळभोर, डॉ. नितीन मटकर, डॉ. नितीन चौधरी, डॉ. नागेश गवते यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात अध्यक्ष डॉ. ओमकुमार हलींगे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. प्रवीण धर्माधिकारी, डॉ. शशिकांत रासकर, डॉ. नितीन तांदळे, डॉ. संदीप महामुनी, डॉ. आनंदकुमार लखपती. डॉ श्रीकांत लोकरे , डॉ. रंजित म्हसवडे, डॉ. प्रतीक जोशी, डॉ. विशाल मुंढे, डॉ. गजानन चेके, डॉ. अमित गुप्ता, डॉ. अतुल झोलेकर, डॉ. वनिता काळभोर, डॉ. तनुजा रासकर, डॉ. मोहिनी भोसले, डॉ. मोनेका ओमकुमार, डॉ. सुप्रिया कोद्रे, सौ. दीपाली धर्माधिकारी, दत्ता कामठे, भगवान राठोड यांचे मोलाचे योगदान राहिले.
पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन क्रिकेट स्पर्धेचे विजेता बारामती सुपर किंग्स संघ