शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 15:50 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे.

पुणे, दि. 20 - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ह्य त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेनह्ण असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही.पवार म्हणाले, मान्सून लांबला आहे. परिणामी राज्याच्या काही भागात दुबार पेरणीची वेळ असून, ते आर्थिकदृष्ट्या संकटच आहे. शेतकरी सध्या या संकटातून जात आहेत. मलाही या सगळ्या गोष्टींची गेल्या दोन-तीन दिवसांपर्यंत भयंकर काळजी होती, परंतु काल हवामान क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागात चांगला पाऊस पडेल. ते खरे ठरावे एवढीच माझी अपेक्षा आहे.तसेच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झाले आहे, असे पत्र बँकेत दिले आहे, असे मला कोठे दिसले नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी