शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

...सुप्रिया सुळेंच्या दिमाखदार विजयानंतरही '' बारामती पिन ड्रॉप सायलेन्स''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:50 IST

बारामतीकरांनी गेल्या ५२ वर्षाच्या राजकारणात  प्रथमच विजयानंतरची शांतता अनुभवली....

ठळक मुद्देपार्थ पवारांच्या पराभवाचे पडसाद  ५२ वर्षात प्रथमच लोकसभेच्या विजयानंतरची शांतता बारामती आणि राजकीय विजयाचे मोठे अतुट नाते

बारामती : देशाच्या राजकारणात मानाचे स्थान असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती हि जन्मभुमी आणि कर्मभुमी म्हणुन ओळखली जाते. ज्येष्ठ नेते यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांना देखील राजकारणात वेगळे स्थान आहे.

वेळोवेळी मिळविलेल्या राजकीय यशाने हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे.मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव झाला. या राजकीय भुकंपाने हे स्थान काही प्रमाणात डळमळले,असे म्हटले तर वावगे ठरु नये.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मोठ्या मताधिक्क्याच्या विजयानंतर देखील केवळ पार्थ पवार यांच्या पराभवामुळे बारामतीत जल्लोष झालाच नाही. बारामतीकरांनी गेल्या ५२ वर्षाच्या राजकारणात प्रथमच विजयानंतरची शांतता अनुभवली.

   बारामती आणि राजकीय विजयाचे मोठे अतुट नाते आहे. आजपर्यंत हे नाते अबाधित होते.निवडणुकीआधीच गुलाल उधळण्याची,फटाक्यांच्या आताषबाजीची तयारी केली जात असे. राष्ट्रवादी काँग्रेस भवन पासुन शहरातुन विजयी मिरवणुकीचा जल्लोष बारामतीकरांनी नेहमीच अनुभवला आहे. पेढे भरवुन  विजयाचे जोरदार स्वागत केले जायचे.आज सकाळी पुण्यात मतदान मोजणी सुुरु झाल्यानंतर  मावळमध्ये पार्थ पवार सुरवातीपासुन पिछाडीवर होते.त्यामुळे बारामतीकर लक्ष देवुन निकाल ऐकत होते. याच वेळी मतमोजणी सुरु झाल्यावर एक तासांनी दुसºया फेरीदरम्यान सुप्रिया सुळे सुमारे ८ हजार मतांनी पिछाडीवर असल्याची बातमी ‘फ्लॅश’ झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकता चुकता राहिला.मात्र,अवघ्या दहा मिनिटात चित्र बदलले. त्यांनतर  खासदार सुळे यांच्या मताधिक्क्याचा आलेख विजय घोषित होईपर्यंत वाढताच होता. शेवटच्या फेरीनंतर सुळे  १ लाख ५४ हजार १५९ च्या मताधिक्क्याने विजयी झाल्याची बातमी बारामतीत धडकली. त्यापाठोपाठ पार्थ यांच्या मावळच्या मोठ्या पराभवाची बातमी देखील ‘फ्लॅश’ झाली.त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी,कार्यकर्ते शांत बसुन होते.बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी त्यांचा मुक्काम मावळमध्ये हलविला.पार्थ यांच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाहि. ‘गड आला,पण सिंह गेला’ असेच काहीसे चित्र बारामतीत दिसुन आले. निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी शहर तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र येतात. आज देखील खासदार सुळे यांच्या विजयोत्सवाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केली होती.विजयी जल्लोषासाठी फटाके,गुलाल आणुन ठेवला,मात्र, पार्थ यांच्या पराभवाच्या बातमीने विजयोत्सवाच्या तयारीवर पाणी पडले. लोकसभेच्या निकालाचे तीव्र पडसाद बारामतीत उमटले. चौकाचौकात असणाºया जल्लोषाची जागा ‘पिन ड्रॉप  सायलेन्स‘ ने घेतल्याचे चित्र होते.———————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNCPराष्ट्रवादी काँग्रेस