बारामती :बारामती-फलटण मार्गावर अचानक टायर फुटलेल्या ट्रकपासुन बचाव करताना एशियाड एसटी बसचा अपघात झाला. शिरवली(ता.बारामती) १८ फाटा येथे झालेल्या या अपघातात एसटी बस उलटल्याने ९ ते १० प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. बारामती एसटी बसस्थानकातुन बारामती फलटण एशियाड बस फलटणला निघाली होती.याचवेळी दुपारी दोन अडीचच्या सुमारास या बसला शिरवली नजीक बुधवारी(दि.११) अपघात झाला. रस्त्यात एसटी बस मार्गस्थ असताना एका ट्रकचा अचानक टायर फुटला.त्यावेळी ट्रकपासून बस वाचविताना बस उलटली. बारामती एसटी आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की,या अपघातात ९ ते १० प्रवाशी जखमी झाले आहेत.कोणत्याही प्रवाशाला गंभीर इजा झालेला नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.जखमींवर बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघातग्रस्त बस फलटण आगाराची असल्याचे गोंजारी यांनी सांगितले.
बारामती- फलटण एशियाड एसटी बसला अपघात; ९ ते १० प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 16:27 IST
टायर फुटलेल्या ट्रकपासुन बचाव करताना बसचा अपघात
बारामती- फलटण एशियाड एसटी बसला अपघात; ९ ते १० प्रवासी जखमी
ठळक मुद्देआठ ते दहा प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती